प्रभात वृत्तसेवा महाबळेश्वर – महाबळेश्वर नगरपरिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकिचा निकाल जाहीर झाला असून नगराध्यक्ष पदा साठी सुनील शिंदे यांनी १,४५८ मताधिक्याने बाजी मारली असून राष्ट्रवादीच्या सर्वाधिक १३ जागांवरती आपली दावेदारी स्थापित केली आहे. महाबळेश्वर येथील एकूण १२७०४ मतदान पैकी १०५७६ इतके मतदान झाले असून प्रभागातील बऱ्याच जागांवरती चुरशीची लढत पहावयास मिळाली येथील गिरीस्थान विद्यालयाच्या प्रांगणात ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे. विजयी उमेदवारांबरोबरच समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला.नगराध्यक्ष सुनील शिंदे (राष्ट्रवादी), विजयी उमेदवार- प्रभाग १ : मधून राजू इस्माईल नालबंद (अपक्ष), विद्या बावळेकर (राष्ट्रवादी). प्रभाग २ : संतोष आखाडे (राष्ट्रवादी). संगीता वाडकर (राष्ट्रवादी). प्रभाग ३: विमल पारठे (राष्ट्रवादी), रवी कुंभारदरे (भाजप), प्रभाग ४ : कुमार शिंदे (अपक्ष), विमल बिरामणे (अपक्ष), प्रभाग ५: संजय बाळकृष्ण जंगम (राष्ट्रवादी), स्मिता पाटील (अपक्ष). प्रभाग ६ : नीता झाडे (अपक्ष), संतोष आबा शिंदे (राष्ट्रवादी).प्रभाग ७: नासिर मुलाणी( राष्ट्रवादी), शबाना मानकर (अपक्ष). प्रभाग ८ : राहुल पिसाळ (राष्ट्रवादी), प्रियंका वायदंडे (राष्ट्रवादी). प्रभाग ९ : अफजलभाई सुतार (राष्ट्रवादी) रेश्मा ढबे (राष्ट्रवादी). प्रभाग १० : रोहित ढेबे (राष्ट्रवादी), पल्लवी कोंढाळकर (राष्ट्रवादी).एकूण २१ उमेदवारांनी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेवर झेंडा फडकवला आहे. सुरवातीपासून ही निवडणूक रंगतदार झाली होती. निवडणुकीची बदलेली तारीख मिळालेल्या वाढीव कालावधीचा योग्य वापर करीत उमेदवारांनी विजय प्राप्त केला असून शांततामय वातावरणात ही निवडणूक पार पडल्याने येथील स्थानिकांमधे आनंदाचे वातावरण आहे.