बुलढाण्यात 5 पैकी 3 बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यात खामगाव व बुलढाणा बाजार समितीत धक्कदायक निकाल समोर आले आहेत. खामगाव येथे विद्यमान भाजपा आमदार आकाश फुंडकर यांना मोठा धक्का बसला असून भाजपाला याठिकाणी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत.
बुलढाणा बाजार समितीत विद्यमान शिवसेनेचे आ.संजय गायकवाड यांना नवख्या असलेल्या ठाकरे गटाचे जालिंदर बुधवत यांनी धोबीपछाड दिली आहे.
आ.संजय गायकवाड यांनी याठिकाणी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र त्यांना मोठा धक्का बसला आहे.
मलकापूर – भाजपा प्रणित पेनेल – भाजपा १६ , अपक्ष १ , महाविकास् आघाडी १. ( सरशी माजी आ.चैनसुख संचेती
मेहकर – शिवसेना – ११ , महविकास् आघाडी – ७ . ( सरशी खा.प्रतापराव जाधव )
बुलढाणा – ठाकरे गट – १२ , भाजपा शिवसेना – ६ ( सरशी जालिंदर बुधवत , ठाकरे गट )
देऊळगाव राजा – महा विकास आघाडी – १५ , शिवसेना – १ , अपक्ष – २ (सरशी राष्ट्रवादी आ.राजेंद्र शिंगणे )
खामगाव – महविकास आघाडी – १६ , भाजपा – ०२ ( सरशी माजी काँग्रेस आ.दिलीप सानंदा )





