महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर आखाडा परिषदेचा मोठा निर्णय ; अध्यक्ष म्हणाले,” हे आपले दुर्दैव..”

Maha Kumbh Stampede । उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत जवळपास 17 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चेंगराचेंगरीनंतर, आखाडा परिषदेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मौनी अमावस्येला अमृत स्नान न करण्यात निर्णय Maha Kumbh Stampede ।
प्रयागराजमधील चेंगराचेंगरीनंतर आखाडा परिषदेने निर्णय घेत मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नान करण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे. ही माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली. ते म्हणाले की, आज प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, आखाड्याने मौनी अमावस्येला अमृत स्नानाचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द केला आहे. आता आज कोणताही आखाडा अमृत स्नान करणार नाही. आखाड्याने छावण्यांमधील त्यांच्या मिरवणुकाही मागे घेतल्या आहेत. अशी माहिती आखाडा महंत रवींद्र पुरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.
महंत रवींद्र पुरी यांनी याविषयी अधिक माहिती देताना,”आज खूप मोठा सण होता पण कदाचित हे आमचे दुर्दैव असेल की आम्ही आज जे स्नान करण्याचा प्रयत्न केला ते करू शकलो नाही. हा उत्सव १४० नंतर आला.
आता वसंत पंचमीची तयारी Maha Kumbh Stampede ।
रवींद्र पुरी पुढे म्हणाले की, “आम्ही संपूर्ण जगाला या महाकुंभाचे साक्षीदार होण्यासाठी आवाहन केले होते. सर्वांनी आमची विनंती मान्य केली. आखाड्यांनी हा निर्णय स्वतःहून घेतला आहे की प्रशासनाच्या सूचनेनुसार असा सवाल करण्यात आला त्यावर उत्तर देताना त्यांनी,” आम्ही जनहितासाठी काम करतो. आम्ही सर्वांच्या सुरक्षिततेसाठी काम करतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. पुढे रवींद्र पुरी यांनी, “आमचा प्रयत्न पुढील स्नान दिव्य आणि भव्य करण्याचा असेल. आता आपण वसंत पंचमीच्या दिवशी अमृत स्नानाची तयारी करू.” असे त्यांनी म्हटले.
ताईच त्यांनी म्हटले कि,”आपल्याला आजचे स्नान पुढे ढकलावे लागेल आणि वसंत पंचमीला होणाऱ्या पुढील स्नानात सहभागी होऊ शकू. आम्ही आजसाठी पूर्णपणे तयार होतो पण आज आमची आंघोळ. नियतीला ते मान्य नव्हते. मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही प्रयागराजमध्ये जिथे असाल तिथेच राहा. आजचा दिवस आपल्यासाठी खूप वेदना आणि दु:खाचा आहे.” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.





