Wai: वाईत महादुर्गा दौड उत्साहात; गोरक्षणासाठी योगदान देणार्या दोघांचा शौर्य पुरस्काराने सन्मान
Wai यंदा गोरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मानद पशुकल्याण अधिकारी सिद्धार्थ लाखे आणि अभय शिंदे यांना वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते गोरक्षण शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Wai: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वाई तालुक्याच्या वतीने आयोजित महादुर्गा दौड धार्मिक उत्साह, शिस्त आणि भगव्या ध्वजाच्या साक्षीने उत्साहात पार पडली. महागणपती घाट येथे सकाळी सात वाजता श्री महागणपतीची आरती, शस्त्रपूजन आणि धर्मध्वज पूजन करून दौडीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ना. मकरंद पाटील, वाईचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के यांच्यासह नगरसेवक, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगव्या ध्वजाच्या साक्षीने आणि जयघोषाच्या वातावरणात शहरातील शाहीर चौक, गंगापुरी, भगवा कट्टा, नगरपालिका, दातार हॉस्पिटल, चावडी चौक, रविवार पेठ, यंग रविवार चौक, रामडोह आळी, ब्राह्मणशाही, किसनवीर चौक आणि सिद्धनाथवाडी-बावधन नाका या मार्गांवरून दौड पुढे सरकली. सोनगिरवाडी येथे दौडीची सांगता झाली.
गोरक्षणासाठी कार्य करणार्या दोघांचा गौरव
यंदा गोरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मानद पशुकल्याण अधिकारी सिद्धार्थ लाखे आणि अभय शिंदे यांना वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते गोरक्षण शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, नगरसेवक भारत खामकर, शैलेंद्र देवकुळे, अजित शिंदे, प्रसाद बनकर, गुरुप्रसाद चव्हाण, नगरसेविका नूतन मालुसरे, अॅड. दीप्ती पिसाळ, संतोष जमदाडे, काशिनाथ शेलार यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. महादुर्गा दौडीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी वाई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.





