BWF Madrid Spain Masters 2024 : पीव्ही सिंधूने गाठली उपांत्यपूर्व फेरी…

Madrid Spain Masters 2024 Badminton :- माद्रिद स्पेन मास्टर्स 2024 बॅडमिंटनमधील द्वितीय मानांकित पी.व्ही. सिंधूने गुरुवारी चिनी तैपेईच्या हुआंग यू हिचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने महिला एकेरी गटात राउंड आॅफ 16 (दुसरी फेरी) फेरीच्या सामन्यात 21-14, 21-12 असा विजय मिळवला. हा सामना 36 मिनिटे चालला.
तत्पूर्वी, सिंधू ( PV Sindhu ) हिने कॅनडाच्या वेन यू झँग हिच्यावर सरळ दोन गेममध्ये विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने 30 मिनिटे चाललेला सामना 21-16, 21-12 असा जिंकला होता.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/madrid-spain-masters-2024-badminton-pv-sindhu-made-it-to-the-second-round-kidambi-srikanth-was-out/
गेल्या दोन आठवड्यात ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप आणि स्विस ओपनमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या स्पेनच्या अव्वल मानांकित कॅरोलिना मारिनने स्पर्धेतून माघार घेतल्याने सिंधू या स्पर्धेत चॅम्पियन होण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. सिंधूने 2022 च्या सिंगापूर ओपन सुपर 500 मध्ये BWF टूरवर तिचे शेवटचे विजेतेपद जिंकले आहे.





