Madhuri Dixit : एका लाइव्ह कार्यक्रमासाठी ठरलेल्या वेळेपेक्षा काही तास उशिरा पोहचल्याबद्दल बॅालिवूडची धकधकगर्ल माधुरी दीक्षितला ट्रोल करण्यात आले होते. कॅनडातील टोरंटो येथे पार पडेलेल्या तिच्या लाइव्ह शोला उशिरा आल्यामुळे माधुरी चर्चेत आली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी माधुरीच्या शोबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या चर्चेदरम्यान, माधुरीने इंन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. नुकतेच माधुरी परदेशातील टूर आणि शोसाठी गेली होती. तिचे टोरंटो येथे आयोजित शोमध्ये नृत्य सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम म्हणजे माधुरीचे नृत्य वेळ आणि पैशांचा अपव्यय झाल्याचे ट्रोलर्संनी म्हटले होते. टीकेनंतर शोच्या होस्टिंग कंपनीनेही ट्रोलिंगवर आपले मत मांडले. पण या सगळ्यात माधुरी दीक्षितने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर आता तिच्या इंन्स्टाग्रामवरील नव्या व्हिडीओत ती व्हेकशन टूराचा आनंद घेताना दिसत आहे. View this post on Instagram A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) ट्रोलिंगला न घाबरता माधुरी दीक्षितने रविवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडीओच्या कॅप्शनमद्ये तिने “हे दऱ्या, हे शांतता आणि फक्त एक क्षण.” असे म्हटले आहे. या पोस्टवर सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी कमेंट्स केल्या आहेत. टोरंटोमध्ये “दिल से… माधुरी” नावाच्या एका लाईव्ह क्रार्यक्रमासाठी माधुरीला रात्री साडेआठ वाजता पोहचणे अपेक्षित होते. मात्र, ती १० वाजाता शोसाठी आली. यामुळे या कार्यक्रमासाठी आलेल्या चाहत्यांना माधुरीची एक झलक पाहण्यासाठी काही तास वाट पाहावी लागली होती. या घटनेमुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. हेही वाचा : “२३० कोटी शुभेच्छा..!” मुरलीधर मोहोळांना वाढदिवसानिमित्त धंगेकरांचा खोचक टोला