Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या एका मोठ्या व्यावसायिक व्यवहारामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने मुंबईतील उच्चभ्रू भाग लोअर परळ येथील प्रतिष्ठित ‘वन लोढा प्लेस’ (One Lodha Place) इमारतीत एक आलिशान कार्यालयीन जागा (कमर्शियल ऑफिस स्पेस) भाड्याने घेतली आहे. या व्यवहारासाठी माधुरीने 5 वर्षांच्या (60 महिन्यांच्या) करारानुसार तब्बल 2.81 कोटी रुपये भाडे भरणार आहेत. 731 चौरस फूट कार्पेट एरियाच्या या ऑफिससाठी तिने 17 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आणि 72,600 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. Madhuri Dixit हा करार नुकताच नोंदणीकृत झाला असून, सोबत एक कार पार्किंगची सुविधाही मिळाली आहे. दरवर्षी भाड्यात 5 टक्के टक्क्यांनी वाढ होणार आहे. यामुळे पाच वर्षांच्या कालावधीत मासिक भाडे 5 लाख रुपयांच्या पुढे जाईल. वर्षानुसार मासिक भाडे खालीलप्रमाणे असेल: पहिले वर्ष: 4.25 लाख रुपये, दुसरे वर्ष: 4.46 लाख रुपये, तिसरे वर्ष: 4.68 लाख रुपये, चौथे वर्ष: 4.91 लाख रुपये, पाचवे वर्ष: 5.16 लाख रुपये असणार आहे. Madhuri Dixit Madhuri Dixit : माधुरी दीक्षितीची नवी गुंतवणूक! परळमध्ये भाड्याने घेतलं ऑफिस याआधीची माधुरीने मोठी गुंतवणूक केली आहे. 2022 मध्ये माधुरी दीक्षितने वरळी येथे समुद्रकिनारी ‘सी-व्ह्यू’ अपार्टमेंट खरेदी केले होते. लोअर परळ आणि वरळी हे दोन्ही भाग सध्या मुंबईतील प्रीमियम हब म्हणून ओळखले जातात. Madhuri Dixit हाय स्ट्रीट फिनिक्स आणि पॅलेडियम मॉल्सजवळ असल्याने तसेच बीकेसी (BKC) आणि नरिमन पॉईंटशी चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे या परिसराला सेलिब्रिटी आणि उद्योजकांची विशेष पसंती आहे. हा नवा व्यावसायिक व्यवहार माधुरी दीक्षितच्या मुंबईतील रिअल इस्टेट गुंतवणुकीचा आणखी एक मोठा भाग आहे.Madhuri Dixit हेही वाचा : Akshay Kumar and Shilpa Shetty : अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी एकत्र; नेटकऱ्यांना झाली ‘धडकन’ची आठवण