Madhuri Dixit and Shriram Nene : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. सध्या दोघेही जपानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. या ट्रिपचे सुंदर फोटो माधुरीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यातील तिच्या जपानी लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माधुरी आणि श्रीराम नेने यांच्या फोटोंमध्ये बर्फाच्छादित माऊंट फुजीचं सुंदर दृश्य पहायला मिळतं आहे. हे ठिकाण परंपरा, मंदिरं, बर्फ आणि समुराई कथांनी भरलेलं आहे, असं कॅप्शन देत माधुरीने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. विशेष म्हणजे माधुरी आणि पतीने जपानची पारंपरिक वेशभूषाही परिधान केली आहे. माधुरीने केशरी रंगाचा पारंपरिक लांब बाह्यांचा ‘युकाटा’ घातला आहे. या लूकमध्ये दोघांनी एकापेक्षा एक पोजही दिल्या आहेत. माधुरी आणि श्रीराम यांचा हटके लुक माधुरीने शेअर केलेल्या फोटोमध्ये मागे माउंट फूजीचा तो भव्य बर्फाच्छादित डोंगर आणि समोर माधुरी पतीसोबत पोज देत आहे. दोघांनी उबदार कपडे परिधान केले आहेत. माधुरीने उबदार स्कार्फ ओढला आहे. लाईट कलरचा स्वेटशर्ट घातला आहे. तर श्रीराम नेनेही कॅज्युअल अंदाजात दिसत आहेत. फुल टीशर्ट, जीन्स आणि गॉगलमध्ये त्यांचा स्मार्ट लूक दिसत आहे. दोघांनी हातात हात घेत मस्त पोजही दिली आहे. Dattatray Bharne : सैनिक सक्षम, तर राष्ट्र समर्थ! सुभेदार सुनील खराडे यांच्या निवृत्ती सोहळ्यात दत्तात्रय भरणे यांचे प्रेरक उद्गार Madhuri Dixit and Shriram Nene माधुरी आणि श्रीराम नेने हे दोघंही उत्तम खवय्ये असून त्यांनी जपानमधील विविध पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. तसेच दोघांनीही जपानचा पारंपरिक पोशाख परिधान करत माऊंट फुजीसमोर फोटोसाठी पोझ दिले आहेत. सध्या त्यांच्या या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. Madhuri Dixit and Shriram Nene हेही वाचा: BAFTA 2026: बाफ्टा 2026 मध्ये ‘बूंग’ची ऐतिहासिक कामगिरी; ‘सिनर्स’चा दमदार दबदबा