Madhuri Dixit : बॅालिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित एका कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॅालिवूडमधील प्रसिद्ध गायकी तिच्या संगीत कार्यक्रमात दोन तास उशिरा आल्याने तिच्यावर टीका करण्यात आली होती. आता माधुरी कॅनडा टूर शो या कार्यक्रमात उशिरा आल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला असून, त्यांनी आपल्या नाराजी सोशल मीडियाच्या माधमातून व्यक्त केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्याकाही प्रतिक्रिया समोर येत आहेत. या प्रतिक्रियेवरून माधुरी दीक्षितची कोण बाजू घेत आहे. तर अनेकजण शोच्या आयोजकांवर नाराजी व्यक्त करीत आहेत. माधुरी दीक्षितचे कॅनडामध्ये शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाहत्यांनी गर्दी केली होती. पण शो ठराविक वेळेपेक्षा तीन तास उशिरा सुरू झाला. यामुळे अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. ‘आजपर्यंतचा सर्वात वाईट शो’ असे एका युजर्नने म्हटले. एका यूजरने लिहिले, “आम्ही इतके पैसे देऊन तिकीट खरेदी केले, पण शो इतका उशिरा सुरू झाला. हे पूर्णपणे व्यवस्थापन आणि कलाकारांचे अपयश आहे. आम्हाला रिफंड हवा आहे. माधुरीच्या एका चाहत्याने आयोजकांवर संताप व्यक्त करत जर नीट व्यवस्थापन केले नसेल तर त्यात माधुरीची काय चूक? असे म्हणत तिची बाजू घेतली. मात्र, शो उशिरा का सुरू झाला याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याशिवाय माधुरी दीक्षितने देखील यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हेही वाचा : “प्रत्येक महिलेच्या खात्यावर ‘या’ दिवशी ३० हजार जमा होणार” ;प्रचार थांबण्याच्या अगोदर तेजस्वी यादवांची मोठी घोषणा