‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ ; संसदेच्या लोकलेखा समितीकडून समन्स; हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी होणार?

Madhavi Puri Buch Summons । ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण संसदेच्या लोकलेखा समितीने माधवी पुरी बूच यांना समन्स पाठवले आहे. त्यांना २४ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सेबीचे इतर अधिकारी आणि वित्त मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांनाही या चौकशीदरम्यान हजर राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी माधवी यांची हिंडेनबर्ग प्रकरणी देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी होण्याची शक्यता Madhavi Puri Buch Summons ।
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, संसदेच्या लोकलेखा समितीने आपल्या वार्षिक कार्यक्रमात ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’च्या म्हणजेच सेबीच्या कारभाराचा संपूर्ण लेखाजोखा घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी हा समन्स पाठवण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, या चौकशीदरम्यान माधवी बुच यांना हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांबाबतही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता वर्तवली जातीय.
हिंडेनबर्गच्या आरोपांवर माधवी बुच यांचे स्पष्टीकरण Madhavi Puri Buch Summons ।
दरम्यान, ’हिंडेनबर्ग रिसर्च’ने माधवी बुच यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते. अदाणी ग्रुप आणि सेबीच्या प्रमुखांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा मोठा आरोप हिंडनबर्गच्या अहवालात करण्यात आला होता. या अहवालातील आरोपांवर माधवी पुरी बुचयांनी प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले होते.
हिंडेनबर्ग रिसर्च’ने केलेल्या आरोपांवर उत्तर देत माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी एक संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केले होते. यामध्ये, हिंडनबर्गच्या अहवालात नमूद केलेल्या निधीतील गुंतवणूक २०१५ मध्ये करण्यात आली होती. जेव्हा ते दोघे सिंगापूरमध्ये राहणारे खासगी नागरिक होते आणि त्यानंतर २ वर्षापूर्वी पूर्णवेळ सदस्य म्हणून सेबीमध्ये माधबी पुरी बुच या सामील झाल्या, असे त्यांनी या निवेदनात म्हटले होते.
हेही वाचा
कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा ; परिसरात शोध मोहीम सुरू





