परळी ते बीड शक्तीप्रदर्शन करत ‘या’ नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

बीड : राज्यात विधानसभा निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. अनेक नेते वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. आज बीडमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातील माधव जाधव या नेत्याने 100 गाड्यांच्या ताफ्यासह परळी ते बीड रॅली काढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
100 गाड्यांचा ताफा, वाजत गाजत पक्षप्रवेश
माधव जाधव यांनी यापूर्वी काँग्रेस आणि त्या नंतर बीआरएस पक्षांमध्ये काम केले होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माधव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. परळी ते बीड अशी एक रॅली काढून जवळपास 100 गाड्यांचा ताफा घेऊन त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
माधव जाधव यांची प्रतिक्रिया
परळी विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरी दहशत संपवून परळीचा विकास करायचा असून आज राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे माधव जाधव म्हणाले आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणूकीत बजरंग बाप्पा सोनावणे यांचा प्रचार केल्याचे देखील माधव जाधव म्हणाले आहेत.





