Madha News : माढा तालुक्यात भोंदूबाबांविरोधातील कारवाई सुरू असतानाच टेंभुर्णी पोलिसांनी आणखी एका भोंदूबाबाला अटक केली आहे. नाना महाराज ऊर्फ गुरु माऊली विरकर याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आडेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. (Madha News) पोलिसांच्या माहितीनुसार, विरकर याने जादूटोणा, करणीबाधा आणि धार्मिक विधींच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली. “तुला करणी झाली आहे, माझ्याकडील कासव घे, तुझ्यावर पैशांचा पाऊस पडेल,” असे सांगून त्याने पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. (Madha News ) पीडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, २०२४ पासून विरकर याने कामाख्या देवीच्या विधीसाठी विमान खर्च, पूजा आणि इतर कारणे सांगत वेळोवेळी १० ते २० हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. (Madha News) तक्रार केल्यास “माझे मोठे राजकीय आणि पोलिसांशी संबंध आहेत, तुला संपवून टाकीन,” अशी धमकीही विरकर याने दिल्याचा आरोप तरुणाने केला आहे. अखेर टेंभुर्णी पोलिसांत २ लाख ३५ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. (Madha News) टेंभुर्णी पोलीस यांनी नाना विरकर आणि त्याचा भाऊ विकास विरकर यांना आश्रमातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अतुल कुलकर्णी यांनी फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. (Madha News)