Mad Sandhu Death : इन्फ्लुएन्सर मॅड संधूच्या हत्या प्रकरणात मोठी कारवाई; शूटरसह दोघांना अटक
दिल्ली पोलिसांनी इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर मॅड संधूच्या (Mad Sandhu Death) हत्येप्रकरणी हवा असलेल्या एका आरोपीला आणि परदेशातून कार्यरत असलेल्या एका गँगस्टरशी संबंधित दुसऱ्या शूटरला अटक केली आहे.

Mad Sandhu Death : दिल्ली पोलिसांनी इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर मॅड संधूच्या (Mad Sandhu Death) हत्येप्रकरणी हवा असलेल्या एका आरोपीला आणि परदेशातून कार्यरत असलेल्या एका गँगस्टरशी संबंधित दुसऱ्या शूटरला अटक केली आहे. या कारवाईमुळे बॉलिवूडमधील एक अभिनेता आणि दिल्लीतील एका व्यावसायिकावर खंडणीसाठी केला जाणारा हल्ल्याचा कट उधळला गेला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख जालंधरचा रहिवासी विकास ठाकूर ऊर्फ विकी (२५) आणि पंजाबमधील तरनतारन येथील दीप ऊर्फ दीपक सिंग अशी पटली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्ली आणि मुंबईत स्वतंत्र मोहिमा राबवून त्यांना अटक केली.
पोलीस उपायुक्त (स्पेशल सेल) नरा चैतन्य यांनी सांगितले की, परदेशात असलेल्या गँगस्टरच्या सूचनेवरून विकास मुंबईहून दिल्लीला आला होता. त्याचा उद्देश एका व्यावसायिकावर गोळीबार करून खंडणी वसूल करणे हा होता. दीपही त्याला नंतर येऊन मिळणार होता, परंतु नियोजित हल्ला होण्यापूर्वीच पोलिसांनी विकासला पकडले. विकासच्या अटकेनंतर, पोलिसांनी मुंबईत दीपचा शोध घेतला.
३ ऑक्टोबर रोजी अमृतसरमध्ये इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर मॅड संधूची हत्या झाल्यानंतर तो तिथे लपून बसला होता. या अटकेमुळे मुंबईतील एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यावर होणारा गोळीबाराचा कटही उधळला (Mad Sandhu Death) गेला. मात्र, त्यांनी संबंधित अभिनेत्याचे नाव उघड केलेले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, गँगस्टरने दीपला मुंबईत लपून राहण्यास सांगितले होते. हा कट एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यावर हल्ला करण्यासाठी आखला गेला होता.
१९८४ च्या शीखविरोधी दंगलींबाबत या अभिनेत्याने केलेल्या कथित विधानांमुळे त्याला लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न होता. विकास सुरुवातीला चोरी आणि बेकायदेशीर सट्टेबाजीसारख्या गुन्ह्यांत सामील होता, त्यानंतर तो संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी जोडला गेला. २०२३ मध्ये त्याने गँगस्टर अनमोल बिश्नोईला बेकायदेशीर शस्त्रे पुरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो अनिल पंडित आणि रणदीप मलिक यांसारख्या इतर गँगस्टर्ससोबत काम करू लागला.
तो त्यांच्यासाठी शस्त्रे मिळवणे, नवीन सदस्यांची भरती करणे आणि खंडणीच्या उद्देशाने विविध ठिकाणांची रेकी (पाहणी) करण्याचे काम करत असे. पूर्वी ट्रक हेल्पर आणि ड्रायव्हर म्हणून काम करणारा दीप, स्थानिक गुंडांच्या संगनमताने संघटित गुन्हेगारीच्या (Mad Sandhu Death) जगात शिरल्याचा आरोप आहे.






