M. K.Stalin : निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मंगळवारी थेट तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन (M. K.Stalin) यांच्या वाहनाची तपासणी केली. त्या राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर, औपचारिक आणि अल्पकालीन स्वरूपाच्या तपासणीनंतर भरारी पथकाने स्टॅलिन (M. K.Stalin) यांच्या वाहनाला पुढील प्रवासाची परवानगी दिली. निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी विविध स्वरूपातील प्रलोभने देण्याचे प्रकार घडतात. त्या प्रलोभनांमध्ये रोकड, मद्य, अंमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंचा समावेश असतो. M. K.Stalin त्यामुळे तशा प्रकारच्या मुद्देमालाचे वाटप रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांकडून तपासणी, छाप्यांची कारवाई केली जाते. तशाच कारवाईचा भाग म्हणून द्रमुक पक्षाचे प्रमुख असणाऱ्या स्टॅलिन यांच्या वाहनाचीही तपासणी करण्यात आली. त्या तपासणीवेळी स्टॅलिन (M. K.Stalin) वाहनामध्येच बसून होते. त्याविषयीचा व्हिडीओ द्रमुककडून सोशल मीडियावरून जारी करण्यात आला. तमिळनाडूत एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीसाठी २३ एप्रिलला मतदान होईल. त्या राज्यात द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता आहे. अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि अभिनेते विजय यांच्या पक्षाने (टीव्हीके) सत्ताधाऱ्यांविरोधात पूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे यावेळी तमिळनाडूत तिरंगी लढत अपेक्षित आहे.