M.A. Baby : विद्यार्थी, जनआंदोलनांचा निवडणुकांवर परिणाम होणार; माकप नेते एम.ए. बेबी यांनी व्यक्त केले मत
निवडणुकांवर दिल्लीच्या जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन आणि इतरत्र होणाऱ्या जनआंदोलनांचा लक्षणीय परिणाम होऊ शकतो, असे भाकीत माकपचे सरचिटणीस एम.ए.बेबी (M. A. Baby) यांनी रविवारी केले.

M. A. Baby : देशातील विविध राज्यांत काही महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांवर दिल्लीच्या जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन आणि इतरत्र होणाऱ्या जनआंदोलनांचा लक्षणीय परिणाम होऊ शकतो, असे भाकीत माकपचे सरचिटणीस एम.ए.बेबी (M. A. Baby) यांनी रविवारी केले.
देशात सर्वसाधारणपणे भयाचे वातावरण होते. ते जंतर-मंतरवरील आंदोलनाने दूर केले. काही वर्षांपूर्वी संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी आंदोलन झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुका (M. A. Baby) झाल्या. शेतकरी आंदोलनाचा प्रभाव पडलेल्या ठिकाणी भाजपला अनेक जागा गमवाव्या लागल्या, याकडे बेबी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष वेधले.
पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांचा संदर्भ देऊन बेबी बोलत होते. आगामी निवडणुकांतील माकपच्या रणनीतीविषयीचे संकेतही त्यांनी दिले. आमच्या पक्षाचा जो काही प्रभाव असेल तो भाजप आणि मित्रपक्षांचा पराभव करण्यासाठी वापरण्याचा आमचा मानस आहे.
जागावाटपाच्या मुद्द्यावर इतर पक्षांशी (M. A. Baby) चर्चा केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे आगामी निवडणुकांत भाजपविरोधात लढण्यासाठी समविचारी पक्षांशी जुळवून घेण्याची माकपची तयारी असल्याचे सूचित झाले.






