Lust Stoires 3 : बोल्ड विषयांना वेगळ्या उंचीवर घेऊन जात तितक्याच प्रगल्भतेने त्याकडे पाहण्याचा दृषिकोन लस्ट स्टोरीच या वेबसिरीजने केला. या वेबसिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटाला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सने २०२६ मध्ये रिलीज होणाऱ्या वेबसिरीजची घोषणा केली असून, यामध्ये ‘लस्ट स्टोरीज’ ३ चा समावेश आहे. या सिरीजचा एक छोटा व्हिडीओ समोर आला असून, व्हिडीओने लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी कलाकारांसह दिग्दर्शकांची दमदार टीम असणार आहे. मानवी इच्छा, वासना आणि नात्यांमधील गुंतागुंत या तीन गोष्टींवर या वेबसिरीजचा डोलारा उभा आहे. अगोदरच्या दोन्ही सीझनमध्ये प्रत्येक एपिसोड वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केला होता. आता तिसऱ्या सीझनमध्ये देखील तोच फॅार्म बघायला मिळणार आहे. या दिग्दर्शकांमध्ये विक्रमादित्य मोटवाने, शकुन बत्रा, विशाल भारद्वाज आणि ‘लापता लेडीज’ फेम किरण राव या चार दिग्दर्शकांचा समावेश असणार आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर उत्सुकता प्रचंड वाढली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक एपिसोडमध्ये नवे कलाकर आहेत. शकुन बत्राने दिग्दर्शित केलेल्या एपिसोडमध्ये अली फजल आणि राधिका मदान यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. विक्रमादित्य मोटवाने यांच्या कथेत राधिका आपटे आणि विजय मुख्य भूमिकेत आहेत. किरण राव यांच्या दिग्दर्शनाखाली गुरफतेह पिरजादा आणि नवोदित अभिनेत्री सना थंपी झळकणार आहेत. तर विशाल भारद्वाज आणि अदिती राव हैदरी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. रोनी स्क्रूवाला आणि आशी दुआ यांनी या प्रोजेक्टची निर्मिती केली आहे. २०१८ मध्ये लस्ट स्टोरीजचा पहिला सीझन रिलीज झाला होता. या सीरीजने धुमाकूळ घातला. पहिल्या सीझनमध्ये कियारा अडवाणी, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांच्या लक्ष वेधक भूमिका होत्या. त्यानंतर या सिरीजचा २०२३ मध्ये दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये काजोल, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या अफलातून भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारूड निर्माण केले. आता तिसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली असून, प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही. पण २०२६ मध्ये लस्ट स्टोरीजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेही वाचा : Election Safety Concerns: बांगलादेशात निवडणुकीपूर्वी भीषण राजकीय हिंसाचार ; ११ जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी