पुणे : स्वतःचे एक सुंदर, आलिशान घर असावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. आता हेच स्वप्न सत्यात उतरले आहे. सुवर्ण खरेदीच्या परंपरेला पुढे चालवण्यासाठी गेल्या 200 वर्षापासून शुद्धतेचा वारसा जपणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स नेहमी आपल्यासाठी आकर्षक ऑफर्स घेऊन येतात. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आयोजित केलेल्या ‘ग्रँड फेस्टिव्ह ऑफर’ सह 2 BHK फ्लॅट जिंकण्याची सुवर्णसंधी यावेळी ग्राहकांना देण्यात आली होती. मेगा ड्रॉच्या माध्यमातून 2 BHK फ्लॅटच्या भाग्यवान विजेत्याची घोषणा करण्यात आली. चंदुकाका सराफ ज्वेल्स च्या सॉलिटेअर बिझनेस हब 2, बालेवाडी हाय स्ट्रीट, बाणेर येथे मेगा ड्रॉ चा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी सांगली येथील नूतन संदीप माने 2 BHK फ्लॅट च्या विजेत्या ठरल्या. बक्षिसांची केवळ घोषणा न करता सदर बक्षिसे प्रत्यक्षात ग्राहकांना प्रदान करण्याची परंपरा चंदुकाका सराफ ज्वेल्स यांनी जपली आहे. चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या सांगली शाखेमध्ये झालेल्या कार्यक्रमात नूतन संदीप माने यांना फ्लॅटच्या किल्ल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या संचालिका संगीता अतुल शहा यांच्याहस्ते प्रदान करण्यात आल्या. यावेळी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा माधुरी श्रीकांत चौगुले, चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे सेल्स हेड प्रभात मेहंदीरत्ता, क्लस्टर मॅनेजर व कर्मचारी वृंद उपस्थित होते. चंदुकाका सराफ ज्वेल्स आधुनिक डिझाईन्स, पारंपरिक दागिने आणि गुणवत्तेची हमी जपत सोनं, हिरे व चांदीचे नवे एक्सक्लुसिव्ह कलेक्शन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत असतात. पुण्यातील रविवार पेठ, चिंचवड, भोसरी, सातारा रोड, कोथरूड, वाकड, चऱ्होली ,बाणेर तसेच महाराष्ट्रातील सातारा, वाई ,कराड, सांगली, कोल्हापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि कर्नाटकातील अथणी, गोकाक, बेळगावी व रबकवी या सर्व शाखांमध्ये ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या एक्सक्लुसिव्ह दागिन्यांची खरेदी करता येणार आहे. तब्बल 200 वर्षांपासून सोन्याची शुद्धता आणि परंपरेचा वारसा जपणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स, ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक आणि प्रत्येक उत्सवाचा खरा सोबती म्हणून आपली परंपरा आणि बांधिलकी जपत आहेत. आपल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल चंदुकाका सराफ ज्वेल्स मनःपूर्वक आभारी आहे.