LSG vs CSK : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 59 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG vs CSK) यांच्यात पार पडला. या सामन्यात लखनऊने चेन्नईवर 7 विकेट्सने विजय मिळवला. लखनऊचे या सिझनमधील आव्हान अगोदरच संपुष्टात आले आहे. तर चेन्नईला प्ले ऑफ मध्ये (LSG vs CSK) स्थान मिळवण्यासाठी हा सामना महत्वाचा होता.मात्र सामन्यात चेन्नईचा पराभव झाल्याने त्यांची प्ले ऑफची वाट अजून खडतर झाली आहे. या सामन्याबद्दल (LSG vs CSK) बोलायचे झाले तर लखनऊने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत चेन्नईला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. कार्तिक शर्मा याने केलेली अर्धशतकी खेळी आणि ऑलराउंडर शिवम दुबे याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. LSG vs CSK लखनऊकडून आकाश महाराज सिंह याने ३ विकेट्स घेतल्या. त्याने या सामन्यात संजू सॅमसन, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि उर्वील पटेल यांची विकेट घेतली. ह्या विकेट्स घेतल्यानंतर त्याने केलेल्या सेलिब्रेशनची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्याने विकेट्स घेतल्यानंतर आकाश सिंहने खिशातून एक चिठ्ठी काढली आणि त्यावर लिहिलं होतं की, ‘“अक्की ऑन फायर… टी-२० क्रिकेटमध्ये विकेट कशी घ्यायची हे आकाशला चांगलंच माहीत आहे…” या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनऊची सुरुवात चांगली झाली. मिचेल मार्श आणि जोश इंग्लिश यांनी पहिल्या ओव्हरपासून चेन्नईच्या गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. या दोघांच्या आक्रमक खेळीने लखनऊने चेन्नईवर शानदार विजय मिळवला. मिचेल मार्शने ९०, जोश इंग्लिशने ३६ आणि निकलोस पूरने नाबाद ३२ धावा केल्या.