नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गॅसचे भाव वाढले; आता ‘एवढे’ पैसे मोजावे लागणार
Updated On:

मुंबई – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल मार्केटिंग कंपन्यांनी गॅसच्या किंमती वाढवून सर्वसामान्य जनतेला झटका दिला आहे. डिसेंबर महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत दोन वेळा वाढ करून 100 रूपयांनी दर वाढवला होता.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी विना अनुदानित 14.2 किलोग्रॅम सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नसून दर 694 रूपयांवर स्थिर आहे. मात्र, कमर्शियल सिलेंडरच्या दरात 17 रूपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे 1332 रूपयांना मिळणाऱ्या कमर्शिअल गॅस सिलेंडरसाठी आता 1349 रूपये मोजावे लागणार आहे.
इंडियन ऑईलच्या म्हणण्यानुसार, एक जानेवारीला 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीमध्ये 1349 रूपये झाली आहे. मुंबईमध्ये 1280.50, कोलकातामध्ये 1410 रूपये, तर चेन्नईमध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 1463.50 रूपयांवर पोहोचली आहे.





