LPG Cylinder Booking : सध्या अनेक ठिकाणी एलपीजी गॅस सिलेंडर फोन कॉलवर बुक होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे गॅस एजन्सींसमोर लांब रांगा लागत आहेत. मात्र ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, फोन कॉलशिवायही चार सोप्या मार्गांनी सिलेंडर बुक करता येते. १. व्हॉट्सअॅपद्वारे बुकिंग रजिस्टर मोबाइल नंबरवरून संबंधित गॅस कंपनीच्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज पाठवा. Indane Gas : ७५८८८८८८२४ वर REFILL असा मेसेज पाठवा. HP Gas : ९२२२२०११२२ वर Hi किंवा Book असा मेसेज पाठवा. Bharat Gas : १८००२२४३४४ वर Hi किंवा Book असा मेसेज पाठवा. २. मिस्ड कॉलद्वारे बुकिंग रजिस्टर मोबाइल नंबरवरून खालील नंबरवर मिस्ड कॉल द्या. Indane Gas : ८४५४९५५५५५ HP Gas : ९४९३६०२२२२ ३. SMS द्वारे बुकिंग रजिस्टर मोबाइल नंबरवरूनच SMS पाठवणे आवश्यक आहे. Indane Gas : ७७१८९५५५५५ वर REFILL असा SMS पाठवा. Bharat Gas : ७७१५०१२३४५ किंवा ७७१८०१२३४५ वर LPG असा SMS पाठवा. ४. मोबाइल अॅप किंवा पेमेंट अॅपद्वारे बुकिंग गॅस कंपनीचे अधिकृत मोबाइल अॅप डाउनलोड करून बुकिंग करता येते. याशिवाय UMANG अॅपचाही वापर करता येतो. Paytm, PhonePe आणि Amazon Pay या पेमेंट अॅप्सवरूनही सिलेंडर बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सिलेंडर डिलिव्हरी न झाल्यास तक्रार कशी कराल? बुकिंग केल्यानंतरही सिलेंडर मिळाले नाही तर खालील टोल फ्री नंबरवर तक्रार करता येते. Indane Gas : १८००-२३३३-५५५ Bharat Gas : १८००-२२-४३४४ HP Gas : १८००-२३३३-५५५ याशिवाय संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा UMANG अॅपद्वारे तक्रार नोंदवता येते व तिचा स्टेटसही ट्रॅक करता येतो. सोशल मीडियावर गॅस कंपनीला टॅग करूनही तक्रार नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.