Nagar | श्रीगोंद्यात कमळ जोरात, तरुणांचा वाढता प्रतिसाद- महाडिक

श्रीगोंदा, (प्रतिनिधी)- श्रीगोंद्यात भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते यांना तरुणांचा प्रतिसाद वाढत असून, मतदारसंघातील कार्यकर्ते रोजच भाजपकडे प्रेरित होत असल्याने श्रीगोंद्यात कमळ जोरात असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब महाडिक यांनी आढळगाव गटातील तरुणांच्या पक्ष प्रवेशावेळी बोलताना सांगितले.
श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांना मतदारसंघात मोठा प्रतिसाद मिळत असून, गावोगावचे तरुण विक्रम पाचपुते व प्रताप पाचपुते यांच्याहस्ते पक्षात प्रवेश करत आहेत. श्रीगोंदा शहर, आढळगाव गट, नगर तालुक्यातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
त्यामुळे कमळाला चांगले दिवस आले आहेत. भाजपचा विकासाचा दृष्टीकोन व उमेदवार विक्रम पाचपुते यांची दूरदृष्टी असल्याने मतदारसंघात विकासाची गंगा आमदार बबनराव पाचपुते यांनी आणली आहे, तोच विकास रथ पुढे नेण्याचे काम विक्रम करणार असल्याचे महाडिक शेवटी म्हणाले.





