K Padmarajan| तामिळनाडूतील सेलम येथील रहिवासी के पद्मराजन यांनी एक, दोन वेळा नाही तर तब्बल 238 वेळा निवडणूक लढवली आहे. मात्र आतापर्यंत त्यांनी एकाही निवडणुकीत विजय मिळवलेला नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचे डिपॉझीटमध्ये जप्त झाले आहे. आतापर्यंत निवडणुकीत अंदाजे एक कोटी रुपये खर्च केले आहेत. असे असताना 65 वर्षीय के पद्मराजन पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.
पद्मराजन यांनी पंचायत निवडणुका आणि अगदी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसह 238 निवडणुका लढवल्या आहेत, परंतु ते कधीही जिंकलेले नाहीत. त्यांना ‘इलेक्शन किंग’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या अनेक पराभवानंतरही, पद्मराजन यांचे मत आहे की लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली पाहिजे. सतत निवडणूक लढवल्यामुळे आणि प्रत्येक निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि दिल्ली बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात अयशस्वी निवडणूक उमेदवार म्हणून नोंदवले गेले आहे.
कोणाविरुद्ध निवडणूक लढवली? K Padmarajan|
पद्मराजन यांनी आतापर्यंत अटलबिहारी वाजपेयी, पीव्ही नरसिंह राव, जे जयललिता, एम करुणानिधी, एके अँटोनी, वायलर रवी, बीएस येडियुरप्पा, एस बंगारप्पा, एसएम कृष्णा, विजय मल्ल्या, सदानंद गौडा आणि अंबुमणी रामादोस यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. पद्मराजन यांनी आतापर्यंत निवडणुकीवर लाखो रुपये खर्च केले आहेत. पद्मराजन यांनी गेल्या वर्षी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पद्मराजन यांनी गजवेल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री केसीआरही याच जागेवरून निवडणूक लढवत होते.
पद्मराजन हे मेत्तूर येथे टायर दुरुस्तीचे दुकान चालवतात. यासोबतच ते स्वत:ला होमिओपॅथिक डॉक्टर म्हणवून घेतात. पद्मराजन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वडोदरा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे होते. 2019 मध्ये त्यांनी वायनाडमधून राहुल गांधींना आव्हान दिले होते. 2019 मध्ये पद्मराजन यांना केवळ 1,887 मते मिळाली होती. 2019 मध्ये पद्मराजन यांनी वायनाड, वेल्लोर आणि धर्मपुरी या तीन जागांवरून निवडणूक लढवली होती आणि तिन्ही ठिकाणी त्यांना 0.5 टक्क्यांहून कमी मते मिळाली.
पद्मराजन यांची एकुण संपत्ती किती?
ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतात, त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी वेगळे निवडणूक चिन्ह मिळते. मासे, अंगठी, टोपी, टेलिफोन अशी निवडणूक चिन्हे त्यांना मिळाली आहेत. यावेळी पुन्हा त्यांनी तामिळनाडूच्या धर्मापुरी मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी त्यांचे निवडणूक चिन्ह ‘टायर’ आहे. निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी 49 हजार रुपये रोख असल्याचे म्हटले आहे.त्यांच्याकडे एक दुचाकी आणि काही दागिने असे एकूण 1.11 लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर 14 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
हेही वाचा:
लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगेचा मोठा निर्णय; म्हणाले “अपक्ष उमेदवार…”