नववारी साडीत अशी दिसतेय फॅशनिस्टा सई ताम्हणकर

मराठी चित्रपट सृष्टीतीत ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर ही आपल्या चित्रपटातील भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असते. तिने मराठीसह अनेक इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये ग्लॅमरस आणि बोल्ड भूमिका केल्या आहेत. तिचा आत्मविश्वासपूर्ण वावर, तिची स्टाइल, फॅशन तिच्याभोवती वेगळे वलय निर्माण करते.

मराठी चित्रपटसृष्टीला नवे असणारे हेच ते ग्लॅमरचे वलय तिच्यामुळे प्राप्त झाले. मात्र यावेळी ग्लॅमरस आणि हॉट अंदाजामध्ये दिसणारी सईने नववारी साडीमधील तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिने आपल्या फॅन्सला चांगलेच घायाळ केले आहे.

सईने नुकतेच फेसबुकवर नववारी साडीमधील तिचे फोटो शेअर केले आहे. या फोटोतील तिच्या महाराष्ट्रीयन लुकला फेसबुकवर चांगलीच पसंती मिळत आहे. दरम्यान, नुकताच तिचा मनोरंजक प्रवास असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×