पुणे जिल्हा | जलजीवनसाठी बारमाही पाण्याचे साठे शोधा

सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदर तालुक्यातील जलजीवन योजनेसाठी स्वतंत्रपणे बैठकीचे आयोजन करून या बैठकीमध्ये अधिकार्यांनी बारा महिने पिण्याच्या पाण्यासाठी स्त्रोत असणार्या योजनांचा आढावा तयार करावा. त्याचबरोबर जलजीवन योजनेमधून प्रलंबित असणारी नळजोड तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्रपणे बैठकीचे आयोजन करावे, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्या.
सासवड (ता पुरंदर) येथील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांनी पुरंदर तालुक्यातील सर्व विभागांचा आढावा घेतला, त्यावेळी सुळे बोलत होत्या. यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, गटविकास अधिकारी डॉ अमिता पवार,
तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, विजयराव कोलते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्वाती दहिवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, नंदूकाका जगताप, संतोष गिरमे, संभाजी जगताप, विश्वास पवार गौरी कुंजिर उपस्थित होते.
तहसीलदार विक्रम रजपूत यांनी आढावा देताना सांगितले की, पुरंदर तालुक्यातील सर्व पदे भरलेले आहेत. आहेत तर पीएम किसान योजने अंतर्गत शेतकर्यांना निधीचे वाटप होत असते तर या वर्षी रिसे पिसे वघळता सर्व भागांमध्ये पाऊस पडला असल्याने सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले की, पुरंदर तालुक्यातील सर्व शाळांच्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने पेट्रोलिंगचे काम केले जाते तर सासवड येथे पोलिसांच्या निवासस्थानाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर सासवड व जेजुरी या दोन्ही ठिकाणी नवीन पोलीस ठाण्याची कामे होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सासवड शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी चारचाकी व दुचाकीसाठी स्वतंत्र मार्ग त्याचबरोबर सासवड शहरांमध्ये तीन सिग्नलची व्यवस्था करण्यात येणार असून यासाठी नागरिकांकडून हरकती मागवण्यात आल्या आहेत.
पुरंदर तालुक्यातील कर्हा नदीला 2019 मोठा महापूर आला होता यामध्ये अनेक बंधार्यांची व स्मशानभूमीची कामे प्रलंबित असून या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा सुरू आहे. – संजय जगताप, आमदार





