आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कोणताही गैरव्यवहार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने सक्त पावले उचलली असून आता निवडणूक आयोगातर्फे स्थानिक पतसंस्थांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांवर देखील करडी नजर ठेवली जाणार आहे.
याबाबत आता पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी पतसंस्थांना रीतसर नोटीस बजावली असून या नोटीसद्वारे पतसंस्थांना झालेल्या व्यवहारांबाबत माहिती देणे सक्तीचे करण्यात आले आहे. सदर नोटीसद्वारे विभागीय आयुक्तांनी पतसंस्थांना आपल्या पतसंस्थेतील केवायसी न झालेल्या खातेदारांच्या खात्यावरून दोन लाखांपेक्षा जास्तीच्या व्यवहारांबाबत माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच ज्या खातेदारांचे केवायसी पूर्ण झाले आहे हे अशा खातेदारांच्या खात्यावरून 10 लाखांपेक्षा जास्तीचे व्यवहार झाले असतील तर त्याबाबत ही माहिती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.