पुणेः पुणे शहर आणि परिसरात घरफोडीच्या घटना वाढलेल्या आहेत. रोज एखादी तरी चोरीची घटना समोर येतच आहे. यातच पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या भूगावमध्ये एक विचित्र चोरीची घटना घडली आहे. या चोरीच्या घटनेची परिसरात चर्चा होत आहे. तुम्हाला वाटलं असेल काही मोठ्या प्रकारची चोरी असेल पण तस नाहीये, चोरी झाली आहे पण ती चक्क लॅालीपॅापची. आता तुम्ही म्हणाल की लॅापीपॅापची चोरी कोण कशाला करेल, हो बरोबर आहे पण चोरी झालीये लॅालीपॅापची. नेमकं काय आहे प्रकरण.. भुगावमध्ये एक बिर्याणी हाऊसचे दुकान आहे. या दुकानात ही विचित्र चोरी झाली आहे. चोरट्यांनी या बिर्याणी हाऊसमधून लॅालीपॅाप चोरले. निखाराशाही बिर्याणी नावाचे हे दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकटून तीन चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. चोरीच्या उद्दशाने शोधाशोध केली. त्यानंतर लॉलीपॉप चोरी करून रस्सा टेस्ट केला. दुकानात असलेली तीस रुपयांची चिल्लर ही त्यांनी चोरली आणि कोल्ड्रिंक्स चोरून त्यांनी पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या विचित्र चोरीची परिसरात चर्चा होत आहे. सतर्क राहणे गरजेचे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकाराच्या चोरीत चोर कोणतीही गोष्ट चोरी करत असताना त्यांचे लक्ष लॉलीपॉप आणि चिल्लरवरही गेले. आणि त्यांनी ती चोरून नेली. पुणे शहर आणि परिसरात अशा चोरींच्या घटनांमुळे चोरीला एक वेगळे वळण प्राप्त झाले आहे. यामुळे पोलिसांना जास्त सतर्क राहावे लागणार आहे.