राजस्थान : ऑलंम्पिक पदक विजेते ‘हे’ दोन खेळाडू थेट निवडणुकीच्या मैदानात

नवी दिल्ली – लोकसभा 2019 निवडणुकीत यावेळेस दोन ऑलंम्पिकपदक विजेत्या खेळाडूंमध्ये राजकीय मैदानात सामना पहायला मिळणार आहे. जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून भाजपने लोकसभा २०१९च्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून राजवर्धन राठोड यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर राजवर्धन राठोड यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने ऑलिंम्पिक सुवर्ण पदक विजेती कृष्णा पूनिया हिला जयपूर ग्रामीणमधून उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसने सोमवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये सहा राजस्थानचे, दोन महाराष्ट्र आणि एक गुजरातचा उमेदवार आहे. या यादीत कृष्णा पूनिया यांना जयपूर ग्रामीणमधून उमेदवारी दिल्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे आता सर्वाचेंच लक्ष लागले असून निवडणुकीच्या मैदानात कोण बाजी मारणार यांची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत ३२५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

ऑलिम्पिक पदक विजेते राज्यवर्धन राठोड केंद्र सरकारमध्ये क्रीडा व युवककल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) आहेत. ते जयपूर ग्रामीणचे खासदार आहेत.

कृष्णा पूनिया यांनी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये थाळीफेक प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. २०१०मध्ये दिल्लीत झालेल्या ऑलंम्पिक स्पर्धेत कृष्णा पूनियाने थाळीफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. कृष्णा पूनिया सध्या राजस्थानच्या सादुलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.