Lok Sabha Election Phase 4 Voting: पुणे, शिरूर, मावळ मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले पहा

Lok Sabha Election Phase 4 Voting: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज 10 राज्यांतील 96 मतदारसंघात मतदान होत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत 1717 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. आज ज्या जागांवर मतदान होत आहे त्यात आंध्र प्रदेशातील 25, तेलंगणातील 17, बिहारमधील 5, झारखंडमधील 4, मध्य प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 11, ओडिशातील 4, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 8 जागांचा समावेश आहे. आणि जम्मू – काश्मीरमधील एक जागा समाविष्ट आहे.
दरम्यान, लोकसभा 2024च्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात एकूण 11 जागांवर मतदान सुरु आहे. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या जागांसाठी मतदान सुरु आहे.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघातील मतदान टक्केवारी –
– पुण्यात पाच वाजेपर्यंत 44.9 टक्के मतदान
पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये पाच वाजेपर्यंत 44.9 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कसबा पेठमध्ये सर्वाधिक 51.07 टक्के मतदान झाले, तर शिवाजीनगरमध्ये सर्वात कमी 38.73 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
– शिरुरमध्ये 43.89 टक्के मतदान
पाच वाजेपर्यंत शिरुरमध्ये 43.89 टक्के मतदान झाले आहे. आंबेगाव वगळता एकाही विधानसभामध्ये 50 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले नाही. आंबेगावमध्ये 53.71 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हडपसरमध्ये सर्वात कमी 38.04 टक्के मतदान झाले आहे.
– मावळमध्ये 46.03 टक्के मतदान
पाच वाजेपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 46.5 टक्के मतदान झाले. पनवेल, कर्जत, चिंचवड आणि पिंपरीमध्ये 50 टक्केंपेक्षा कमी मतदान झाले आहे. उरण आणि मावळमध्ये 50 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले आहे.
कोणत्या उमेदवारांमध्ये लढत?
मावळ: मावळमध्ये महायुतीचे (शिवसेना) श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात लढत आहे.
पुणे: पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात लढत आहे.
शिरूर: शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्यात लढत आहे.





