मोदींच्या रोड शोसाठी कोट्यवधींचा निधी कुठून आला? त्यांच्या रोड शोसाठी कुणी खर्च केला? संजय राऊतांचा सवाल

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या २० मे रोजी पार पडणार आहे. अशात काल १७मेला मुंबईत सभांचा धडाका झाला. मुंबईत अन् राज्यात पहिल्यांदाच मोदीराज पाहायला मिळाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे प्रथमच एकाच व्यासपीठावर दिसले. शिवाजी पार्कवर जाहीर सभेपूर्वी त्यांनी रोड शो करुन शक्ती प्रदर्शन केले. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर सणसणीत टीका केली आहे. मोदींच्या रोड शोसाठी कोट्यवधींचा निधी कुठून आला? त्यांच्या रोड शोसाठी कुणी खर्च केला? असा सवाल करत संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Lok Sabha Election 2024 । संजय राऊत म्हणाले
‘भाजप, मिंधे गट, अजित पवारांचा गट, त्यांच मुख्य हत्यार या लोकशाहीत पैसे वाटणे आणि धमक्या देणे हेच आहे. अजित पवारांनी बारामती मध्ये कसे पैसे वाटले हे बघितलं आणि 12 वाजेपर्यंत बँका चालू ठेवल्या हे समोर आल्याचे ते म्हणाले. ते आरोप करतांना पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून 19 पैशांच्या बॅग कशा उतरल्या ते मी दाखवल्या त्यानंतर त्यांनी दोन दिवसानंतर नाटक करून त्यांचे कपडे दाखवले. प्रत्येक मतदारसंघात 25 कोटी रुपये त्यांनी पोचवले आहे. पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप होत आहे.’ असा आरोप राऊतांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांपूर्वी मुंबईत होते. काल ही ते मुंबईत होते. त्यांनी रोड शो केला. हा भारतीय जनता पक्षाचा प्रायव्हेट कार्यक्रम प्रचाराचा कार्यक्रम होता. त्यांच्यासोबत असलेल्या मिंधे आणि अजित पवार गटाचा होता. नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचा खर्च त्यांच्या पैशातून व्हायला पाहिजे होता. भाजपाच्या पैशातून व्हायला पाहिजे होता. परंतु जो पैसा खर्च झाला तो पैसा मुंबई महानगरपालिकेने खर्च केल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.





