Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या जागावाटपावरून खटके उडत असल्याचे दिसत होते. काही जागांवर एकापेक्षा अधिक पक्षांनी दावा केल्याने महाविकास आघाडीतील तिढा सुटणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.
मात्र माहाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी एकत्र येत जागावाटपाचा वाद अखेर सोडवला आहे. याबाबत महाविकास आघाडीतर्फे एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर केले. यामध्ये शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागा पुढील प्रमाणे
बारामती – सुप्रिया सुळे
शिरूर – डॉ. अमोल कोल्हे
सातारा -शशिकांत पाटील
भिवंडी -सुरेश म्हात्रे
दिंडोरी -भास्करराव भगरे
माढा -राष्ट्रवादी -उमेदवार घोषणा नाही
रावेर – रवींद्र पाटील
वर्धा – अमर काळे
अहमदनगर – निलेश लंके
बीड – बजरंग सोनवणे
हे वाचल का ? प्रमोद कृष्णम यांचा खोचक सल्ला,’राहुल-प्रियांका गांधी यांनी पाकिस्तानमधून निवडणूक लढवावी’