Lok Sabha Election 2024: आतापर्यंत किती जागांवर मतदान झाले ? जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक२०२४ साठी आतापर्यंत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (१३ मे) मतदान झाले. चौथ्या टप्प्यात देशातील लोकसभेच्या अर्ध्याहून अधिक जागांवर मतदान झाले आहे. यासह देशातील २२ राज्यांमध्ये आतापर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यातील मतदानाचा संपूर्ण लेखाजोखा समजून घ्या:-
लोकसभेच्या एकूण जागा : ५४३
चार टप्प्यात मतदान झाले – ३७९
आतापर्यंत किती जागांवर मतदान झाले?
पहिला टप्पा – १९ एप्रिल – २१ राज्यातील १०२ जागा
दुसरा टप्पा – २६ एप्रिल – १२ राज्यांतील ८८ जागा
तिसरा टप्पा – ७ मे- ११ राज्यांतील ९३ जागा
चौथा टप्पा – १३ मे – १० राज्यांतील ९६
आगामी मतदान तारखा
पाचवा टप्पा – २० मे – ८ राज्यांत ४९ जागा
सहावा टप्पा – २५ मे – ७ राज्यांत ५८ जागा
सातवा टप्पा – १ जून – ८ राज्यांत ५७ जागा
२२ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान संपले
चौथ्या टप्प्यासह अनेक राज्यांमध्ये लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. उत्तराखंड, तामिळनाडू, केरळ, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आसाम, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, मेघालय, सिक्कीम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि अरुणाचल राज्यात चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया संपली.
या राज्यांमध्ये लोकसभेची प्रत्येकी एक जागा
१. उत्तर-पूर्व सिक्कीम- १९ एप्रिलला मतदान
२. नागालँड – १९ एप्रिलला मतदान
३. मिझोराम- १९ एप्रिलला मतदान
कोणत्या राज्यात किती टक्के मतदान?
तामिळनाडू – ३९ जागा – ६९.७२%
उत्तराखंड- ५ जागा-५७.२२%
केरळ -२० जागा – ७१.२७%
गोवा – २ जागा – ७५.२०%
अरुणाचल प्रदेश – २ जागा – ७७.६८%
नागालँड – ५७.७३%
मिझोराम- १ जागा ५६.८७%
सिक्कीम – १ जागा ७९.८८%
मेघालय २ जागा – ७६.६०%
छत्तीसगड – ११ जागा – ७१.८६%
आसाम – १४ जागा – ८०.३८%
मणिपूर – २ जागा – ८०.७८%
त्रिपुरा – २ जागा – ८०.९२ %
राजस्थान – २५ जागा ६१.३५%
कर्नाटक – २८ जागा – ६९.९९%





