Lok Sabha Election 2024 । Uddhav Thackeray । Modi government – भाजपने देशात सर्वच स्तरांवर आर्थिक अफरातफर केली आहे. त्याच अफरातफरीच्या पैशांवर त्यांचे राजकारण सुरू आहे. सीएसआर फंडातही भाजपने हात मारला आहे आणि हा आकडा 1 कोटी 14 लाख 470 इतका आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काही दिवसातच ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्याहीपूर्वी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच करवसुलीसंदर्भात आक्षेप घेत काँग्रेसची खाती गोठवण्यात आली होती. । Lok Sabha Election 2024 । Uddhav Thackeray । Modi government
याच मुद्द्यावरुन आता इंडीया आघाडीसह विरोधक आक्रमक झाले असून रविवारी रामलीला मैदानात अनेक पक्षांमधील बड्या नेत्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात आवाज उठवला. या रॅलीच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.
मनमोहन सरकारने 2013 मध्ये एक कायदा केला. प्रत्येक कंपनीला 2 टक्के लाभाचा पैसा सीएसआर म्हणजे जनकल्याणाच्या कार्यात द्यावा लागेल. हा पैसा लोकांसाठी वापरायचा होता, पण भाजपने हा पैसा त्यांच्या खासगी संस्था, स्वतःची प्रसिद्धी व इतर बनावट कार्यात वापरला.
त्यांच्या मर्जीतल्या विश्वस्त संस्था, एनजीओच्या खात्यात हा पैसा वळवून दुसऱ्या मार्गाने त्याच कंपन्यांच्या मालकांना लाभ मिळवून दिले. यातील पैसा परदेशातही गेला. आंगडियांचा वापर करून ‘मनी लाँडरिंग’ झाले. पण येथे ना ‘ईडी’ घुसली ना तुमचे इन्कम टॅक्सवाले, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
नोटाबंदीच्या काळात रिझर्व्ह बँकेतून 500च्या 88 हजार कोटी रुपयांच्या नोटा गायब झाल्या. नव्याने छापलेल्या त्या नोटा रिझर्व्ह बँकेत पोहोचल्याच नाहीत. हे पैसे मध्येच गायब झाले. या पैशांना कोठे पाय फुटले? जर हे सर्व खरे असेल तर त्याबाबत काय कारवाई झाली?
हे पैसे कुणाच्या खात्यात गेले की घशात गेले? याच पैशांवर उद्याच्या लोकसभा निवडणुका लढवल्या जाणार आहेत. यावर काहीच खुलासा झालेला नाही. हे भारतीय जनता पक्षाचे पाप आहे, अशा शब्दांमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. । Lok Sabha Election 2024 । Uddhav Thackeray । Modi government