नेवासा – शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मनसे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे व राजेश लुटे यांनी केली आहे.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार आहे. मनसेच्यावतीने शिर्डी लोकसभा मतदार संघातून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
शिर्डी हे साईबाबांचे जागतिक दर्जाचे तिर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात या साईंच्या दरबारातून मनसेच्यावतीने निवडणूक लढल्यास आपल्या पक्षवाढीसाठी मोठी मदत होईल. नगर जिल्हा हा महाराष्ट्रातील मध्यवर्ती व साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून संपूर्ण राज्याला सुपरिचित असल्याने या जिल्ह्याला विशेष महत्व आहे, त्यामुळे नांदगावकर यांना येथून उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
माजी नगरसेवक दत्तू कोते, श्रीरामपूर उपजिल्हाध्यक्ष विलास पाटणी, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, सतिश कुदळे, शहराध्यक्ष राहाता, तालुकाध्यक्ष गणेश जाधव, शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर, कोपरगाव शहराध्यक्ष बापू काकडे, संगमनेर तालुकाध्यक्ष दीपक वरपे, शहराध्यक्ष तुषार ठाकूर, नेवासा तालुकाध्यक्ष दिगंबर पवार, शहराध्यक्ष रवींद्र पिंपळे, अकोले तालुकाध्यक्ष दत्ता नवले, शहराध्यक्ष ललित नवले, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही मागणी ठाकरे यांच्याकडे केली आहे.