पुणे- लाॅकडाऊनमुळे अनेकांची लग्न खोळंबली आहे. त्यामुळे पुण्यातील गुलटेकडी येथील प्रशांत सलगर आणि मार्कट यार्डमधील रेखा सोनटक्के यांनी अवघ्या पाच जणांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने लग्न उरकले आहे. महत्वाची बाब म्हणजे या लग्नात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांंत पाटील यांनी उपस्थिती लावली होती.
पुण्यात सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे लाॅकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे. त्याच भीतीने अनेकजण साध्या पद्धतीने लाॅकडाऊनचे नियम पाळत लग्न उरकताना दिसत आहे.
दरम्यान, वराकडील मोठा भाऊ, वधुची आई, आमदार पाटील, नगरसेवक भिमाले, भाजप झोपडपट्टी आघाडीचे गणेश शेरला, बुद्ध विहाराचे अध्यक्ष गणेश चव्हान यांच्या उपस्थितीत सातारा रोडवरील तक्षशिला बौद्ध विहारात हा विवाह संपन्न झाला.