#Lockdown : ‘या’ देशात करोनाचा ‘स्फोट’, दररोज 1 हजार मृत्यू; पुन्हा कडक लाॅकडाऊन जाहीर

साओपावलो – ब्राझीलमध्ये करोनाचे रूग्ण पुन्हा मोठ्या संख्येने वाढले असून ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी ब्राझील सरकारने आपल्या देशात अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन प्रस्तावित केले आहे.

या रोगामुळे त्या देशात रोज किमान एक हजार जण मरण पावतात तसेच अतिदक्षता विभागात मोठ्या प्रमाणात हे रूग्ण दाखल होत असल्याने आता तिथेही आम्हाला व्यवस्था अपुरी पडू लागली आहे.

त्यामुळे आता लॉकडाऊन पुकारण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही असे त्या देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. ज्या शहरातील रूग्णालयांतल्या 85 टक्के खाटा करोनाच्या रूग्णांनी भरल्या आहेत त्या भागात तातडीने हे लॉकडाऊन अस्त्विात येत असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.

ब्राझीलमध्ये नव्याने आलेली करोनाची ही लाट अत्यंत वेगाने पसरते आहे. त्यात पुर्वीच्या लाटेपेक्षाही अधिक मोठा फटका बसण्याची चिन्हे तिथे दिसू लागली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.