हसावे की रडावे? लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीनिमित्त वुहानमध्ये जल्लोष?

Updated On:

बीजिंग – मागील वर्षापासून संपूर्ण जग करोनाव्हायरसच्या फैलावामुळे कोव्हिड-19 चा सामना करत आहे. सध्या मृतांच्या संख्येत घट होत असली आणि रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असला, तरी धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. या महामारीवर लस उपलब्ध झाली असली तरी ते मर्यादित प्रमाणात आहे. शिवाय लसीच्या दुष्परिणामांची चर्चाही होत आहे.

अशातच येत्या 23 जानेवरीला चीनच्या वुहान शहरात आणि देशाच्या विविध भागात जगातल्या पहिल्या-वहिल्या 76 दिवसांच्या लॉकडाऊनची वर्षपूर्ती जल्लोषात साजरी करण्याची तयारी सुरु आहे. सर्वांना आठवत असेलच के, याच वुहान शहरातून करोनाव्हायरस जगभर फैलावला होता. सुरुवातीला याच शहरात हजारो माणसे कोविड-19 मुळे मरण पावली होती. तेथूनच ही महामारी जगभर पसरली होती.

सध्या वुहानमधील रेस्टॉरंट्‌स, पब्ज आणि नाईट क्‍लब्जमध्ये एकाच गोष्टीची तयारी सुरु आहे, ती म्हणजे लॉकडाऊनची वर्षपूर्ती. त्यानिमित्त अनेक ठिकाणी रिसॉर्टसमध्येही गाण्यांचे कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा आणि अन्य मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे अयोजन करण्यात येत असून, तरुणाई सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणि मास्कचा वापर न करता संयोजनात गुंगून गेल्याचे दिसून येत आहे. चीन सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयाचे समर्थन करणारी एक फिल्म तयार केली असून आम्ही कशा पद्धतीने महामारीवर यशस्वीपणे मात केली, हे त्यात सांगण्यात आले आहे.

संपूर्ण जगाला मरणाच्या खाईत ढकलेल्या या महामारीचा उगम जेथून झाला, त्या शहरात असे जल्लोषाचे वातावरण पाहून एक नकारात्मक संदेश संपूर्ण जगात जात असल्याची भावना चीनबाहेरील युवा पिढी व्यक्त करत आहे. चीनसह सर्वच देशांची अर्थव्यवस्था अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत ढासळली, अनेकांचे प्रियजन काळाने हिरावून नेले, अनेक जण बेरोजगार झाले तर अनेकांच्या व्यवसायाची गणिते कोलमडली असे विदारक चित्र असताना, वुहानमधील जल्लोषाबाबत नकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.

आणखी संबंधित बातम्या

चीनच्या वुहानमध्ये करोना परतला; एक कोटीहून अधिक जणांची होणार चाचणी

2021-08-03 16:58:53

चीनच्या वुहानमध्ये करोना परतला; एक कोटीहून अधिक जणांची होणार चाचणी

वुहानमधील प्रयोगशाळांतून करोना विषाणू जगभर पसरल्याचा दावा चीनने फेटाळला

2021-07-22 18:07:30

वुहानमधील प्रयोगशाळांतून करोना विषाणू जगभर पसरल्याचा दावा चीनने फेटाळला

तीन मुले जन्माला घालायला चीनमध्ये परवानगी; लोकसंख्या घटल्याचा परिणाम

2021-05-31 16:13:37

तीन मुले जन्माला घालायला चीनमध्ये परवानगी; लोकसंख्या घटल्याचा परिणाम

अधिक ऑक्‍सिजनसाठी पालथे झोपण्याची सवय लावा

2021-04-24 08:01:25

अधिक ऑक्‍सिजनसाठी पालथे झोपण्याची सवय लावा

चीनचा पुन्हा 'असहकार'!

2021-01-15 18:42:10

चीनचा पुन्हा 'असहकार'!