मलिकांनी फोडला ‘ऑडिओ क्लिप’चा बॉम्ब, एनसीबी आणि वानखेडेंवर केले गंभीर आरोप

Updated On:
मलिकांनी फोडला ‘ऑडिओ क्लिप’चा बॉम्ब, एनसीबी आणि वानखेडेंवर केले गंभीर आरोप

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज एनसीबीच्या भ्रष्ट कार्यपद्धतीवर पुन्हा एक गंभीर आरोप पत्रकार परिषदेत केला.

“मँडी नावाच्या पंच साक्षीदाराला जुन्या केसमध्ये मागील तारखेवर जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीच्या किरणबाबू नावाच्या अधिकाऱ्याकडून कार्यालय सोडून अन्यत्र बोलावण्यात आल्याची संभाषणाची ऑडिओ क्लिप नवाब मलिक यांनी जाहीर केली.

दरम्यान, एनसीबीचे वादग्रस्त विभागीय संचालक समीर वानखेडे त्या साक्षीदाराला स्वाक्षरी करण्याची सूचना देत असल्याचेही संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याने एनसीबी कशापद्धतीने फर्जीवाडा करत आहे, हे  नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

एनसीबीचे वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एनसीबीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी फर्जीवाडा करणारा व चुकीच्या पद्धतीने लोकांना अडकवणारा अधिकारी असल्याचा अहवाल दिला असतानाही भाजपाचा राज्यातील एक मोठा नेता त्याला पुन्हा मुदतवाढ मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृहविभागाकडे प्रयत्नशील आहे, असा गौप्यस्फोट करतानाच समीर वानखेडे याला मुदतवाढ द्या त्यामुळे खंडणी वसूल करण्याच्या खेळात कोण कोण सहभागी आहेत. हे उघड करण्याची संधी मिळेल, असेही नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.

आणखी संबंधित बातम्या

नवाब मलिकांना त्यांच्या होमपीचवर मोठा धक्का ; भाऊ कॅप्टन मलिक यांचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून दारुण पराभव

2026-01-16 13:30:16

नवाब मलिकांना त्यांच्या होमपीचवर मोठा धक्का ; भाऊ कॅप्टन मलिक यांचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून दारुण पराभव

भाजपच्या बड्या नेत्याने उमेदवारीसाठी 50 लाख रुपये घेतले; कट्टर समर्थकाचा खळबळजनक आरोप

2026-01-01 21:18:42

भाजपच्या बड्या नेत्याने उमेदवारीसाठी 50 लाख रुपये घेतले; कट्टर समर्थकाचा खळबळजनक आरोप

नवाब मलिकांकडे नेतृत्व देण्यास भाजपचा विरोध; मुंबई निवडणुकासाठी आघाडीला नकार

2025-12-17 10:56:54

नवाब मलिकांकडे नेतृत्व देण्यास भाजपचा विरोध; मुंबई निवडणुकासाठी आघाडीला नकार

Nawab Malik : नवाब मलिकांना कोर्टाचा दणका ! मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित

2025-11-18 18:21:34

Nawab Malik : नवाब मलिकांना कोर्टाचा दणका ! मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित

Nawab Malik : नवाब मलिकांचे कमबॅक ! अजित पवारांनी सोपवली 'ही' मोठी जबाबदारी

2025-08-13 19:57:07

Nawab Malik : नवाब मलिकांचे कमबॅक ! अजित पवारांनी सोपवली 'ही' मोठी जबाबदारी