“कोट्यावधीशांचे कर्ज माफ, पण शेतकरी दुर्लक्षितच”; महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याबाबत राहुल गांधींचे ट्वीट

Rahul Gandhi | राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. नुकतेच राज्यात जानेवारी ते मार्च महिन्याच्या कालावधीत तब्बल ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे. यावर आता राहुल गांधी यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधींचे ट्वीट
“विचार करा… अवघ्या ३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हा फक्त आकडा आहे का? नाही. हे ७६७ उध्वस्त झालेली घरं आहेत. ७६७ कुटुंबं जी कधीच सावरू शकणार नाहीत. आणि सरकार गप्प आहे. शेतकरी दररोज कर्जाच्या खड्ड्यात अधिक खोलवर बुडत आहे. बियाणं महाग आहे, खत महाग आहे, डिझेल महाग आहे. पण MSP ची कोणतीही हमी नाही. जेव्हा ते कर्जमाफीची मागणी करतात, तेव्हा त्यांना दुर्लक्षित केलं जातं, पण ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, त्यांची कर्ज मोदी सरकार सहज माफ करते,” असे राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हंटले आहे.
सोचिए.. सिर्फ 3 महीनों में महाराष्ट्र में 767 किसानों ने आत्महत्या कर ली।
क्या ये सिर्फ एक आंकड़ा है? नहीं। ये 767 उजड़े हुए घर हैं। 767 परिवार जो कभी नहीं संभल पाएंगे।
और सरकार? चुप है। बेरुख़ी से देख रही है।
किसान हर दिन कर्ज़ में और गहराई तक डूब रहा है – बीज महंगे हैं, खाद… pic.twitter.com/uDzFpYoMrG
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 3, 2025
“अनिल अंबानी यांचं ४८,००० कोटींचं SBI फ्रॉड समोर आले आहे. पण सरकारने यावर अजून कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. मोदीजी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, असे म्हणाले होते, पण आज परिस्थिती अशी आहे की अन्नदात्याचं आयुष्यच अर्धवट संपत आहे. अन्नदाता असुरक्षित आहे, हताश आहे आणि या व्यवस्थेने त्याला संपवण्याचा धंदाच चालवला आहे आणि मोदीजी फक्त स्वतःच्या PR चा तमाशा पाहत आहेत, ” असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे. Rahul Gandhi |
दरम्यान, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबरोबरच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, कापसाला भाव मिळालेले नाही, या मुद्द्यावरून विरोधकांकडून पावसाळी अविधवेशनातही गदारोळ सुरू आहे. Rahul Gandhi |
हेही वाचा:
देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॅालिवूडमध्ये कमबॅक करणार? स्वतः केला खुलासा; म्हणाली “मी लवकरच…”





