Nostradamus Predictions : आधुनिक नॉस्ट्रॅडॅमसची 2023 साठी 3 भीतीदायक भविष्यवाणी, जगात विनाशाची चिन्हे ?

जगात असे अनेक संदेष्टे होते ज्यांच्या भविष्यवाण्यांवर लोक विश्वास ठेवतात. या यादीत बल्गेरियाच्या बाबा वेंगा आणि फ्रान्सचे प्रसिद्ध भविष्यवेत्ते मायकल डी नॉस्ट्राडेमस यांची नावे आहेत. सध्या नव्या ब्राझिलियन संदेष्ट्याची तुलना नॉस्ट्राडेमसशी केली जात आहे आणि त्याला आधुनिक नॉस्ट्राडेमस म्हटले जाते.
या व्यक्तीचे नाव एथोस सालोम (Athos Salome) आहे, ज्याच्या अनेक भविष्यवाण्या खरे ठरल्या आहेत. सध्या त्याची खूप चर्चा होत आहे. एथोस सलोमने कतारमध्ये होणार्या फिफा विश्वचषक 2022 चीही भविष्यवाणी केली आहे. फिफा विश्वचषक 2022 बद्दल सलोमीचे भाकीत अगदी खरे ठरले आहे.
Beauty Tips for bride and groom : लग्नाच्या 1-2 दिवसाआधी ‘या’ ब्यूटी ट्रिटमेंट करणे पडू शकतं महागात!
लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील संघ अर्जेंटिना आणि किलियन एमबाप्पेचा फ्रान्स यांच्यात अंतिम सामना रंगेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. मेस्सीची टीम अर्जेंटिना वर्ल्ड चॅम्पियन होईल, असा अंदाज सलोमेने व्यक्त केला. आता त्याने (Nostradamus’ predictions for 2023) 2023 या वर्षासाठीही अनेक भीतीदायक भविष्यवाण्या केल्या आहेत.
बर्फाखालील विषाणूचा कहर
एका मीडिया रिपोर्टनुसार, एथोसने 2023 या वर्षासाठी अनेक संभाव्य अंदाज वर्तवले आहेत. या अंदाजांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एथोसने पहिल्या भविष्यवाणीत रोगराईचे भाकीत केले होते. त्याच्या म्हणण्यानुसार अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या पृष्ठभागाखाली एक नवीन प्राणघातक विषाणू आहे ज्यामुळे जगात कहर होऊ शकतो. सायबेरियातील बर्फाखाली असलेल्या विषाणूंवरील वैज्ञानिकांच्या संशोधनामुळे सॅलोमच्या भविष्यवाणीला समर्थन मिळाले आहे.
झोम्बी व्हायरस
शास्त्रज्ञांच्या संशोधनात सुमारे 50 हजार वर्षे जुना ‘झोम्बी व्हायरस’ समोर आला आहे. ओहायो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या चमूने तिबेटच्या हिमनद्यांमध्ये सुप्त अवस्थेत असलेले 28 अज्ञात विषाणू शोधून काढले. ग्लोबल वॉर्मिंग वाढल्याने या विषाणूंचा धोकाही वाढेल अशी भीती आहे. अंटार्क्टिकाच्या बर्फातून विषाणू बाहेर पडतील आणि जगात हाहाकार माजवेल, असा एथोसचा अंदाज आहे.
एरिया -51 वर आश्चर्यकारक दावा
आधुनिक नॉस्ट्रॅडॅमस म्हणतात की, अमेरिकेत असलेल्या एरिया-51 मध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत. अमेरिकेच्या या गुप्त ठिकाणी एलियन्सना कैद करून यूएफओ पाहण्याचा दावा करण्यात आला आहे. एथोसने आता दावा केला आहे की एरिया-51 मध्ये एक गुप्त गुहा आहे. ही गुहा 2023 मध्ये उघडली जाईल. यासोबतच ही गुहा दुसऱ्या जगात जाण्याचा मार्ग बनणार असल्याचे एथोसने सांगितले आहे.





