लंडन -निर्धारीत वेळेच्या अखेर मिनिटाला आत्मघाती गोल स्वीकारल्याने टोटेनहॅम होटसस्पूर्स संघाला इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत लिव्हरपूल विरूद्ध पराभव स्वीकारावा लागला. या विजयामुळे लिव्हरपूल संघाचे लीगमध्ये 32 सामन्यांत सर्वाधिक 79 गुण आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मॅंचेस्टर सिटी संघाचे 31 सामन्यात 77 गुण आहेत.
सामन्याच्या पाहिल्या सत्रात लिव्हरपूल ने आक्रमक खेळ केला. 16 मिनिटाला रॉबर्टो फर्मिंगोने गोल करत लिव्हरपूलला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाहिल्या सत्रात दोन्ही संघांनी बरेच प्रयत्न करूनही गोल होऊ शकला नाही. त्यामुळे लिव्हरपूल 1-0ने आघाडीवर राहिला.
दुसऱ्या सेटमध्ये पहिले 25 मिनिटे गोल होऊ शकला नाही. त्यानंतर टोटेनहॅमच्या लुकासने मैदानी गोल करत 1-1 अशी बरोबरी साधली. परंतु 90 व्या मिनिटाला टोटेनहॅमच्या संघाने स्वयंगोल स्वीकारल्याने त्यांचा 2-1 अशा फरकाने पराभव झाला.