महापालिका प्रशासनाचे ‘लाइव्ह’ वाभाडे

Updated On:

एक लढा भ्रष्टाचाराविरोधात; फेसबुक लाइव्हची शहरात जोरदार चर्चा

पिंपरी – थेट बॅंक खात्यावर लाच घेतल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्यानंतरही त्या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पालिका प्रशासन आणि आयुक्तांचे अक्षरश: फेसबुक लाईव्हद्वारे आज (रविवारी) वाभाडे काढण्यात आले. सत्ताधारी नगरसेवक असलेल्या तुषार कामठे यांनी एक लढा भ्रष्टाचाराविरोधात ही मोहीम हाती घेत शहरवासीयांना सहभागी होण्याचे आवाहन केल्यामुळे पालिका विरुद्ध भ्रष्टाचार विरोधी चळवळ असा वाद शहरात पहावयास मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात नगरसेवक तुषार कामठे यांनी 4 जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पुराव्यानिशी आवाज उठविला होता. या प्रकरणाबाबत 15 दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी दिले होते. मात्र या अधिकाऱ्यांना वाचविण्याचाच प्रयत्न सुरू झाल्यामुळे कामठे यांनी “एक लढा भ्रष्टाचाराविरोधात’या टॅगलाईनखाली मोहीम सुरू केली आहे. आज या मोहिमेबाबत त्यांनी शहरवासीयांशी संवाद साधत महापालिका प्रशासनाचे वाभाडे काढले.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी लागेबांधे करुन महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा मोबाईल क्रमांक घ्यावा.

त्यावर “मिस कॉल’ करुन भ्रष्टाचाराला सनदशीर मार्गाने विरोध करावा, असे आवाहन भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी केले आहे. महापालिका ठेकेदारांनी चालवायला घेतली आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वैद्यकीय, स्मार्ट सिटी, स्थापत्य, आरोग्य आणि शालेय शिक्षण हे विभाग सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित आहेत.

त्यामुळे त्यामध्ये कोणताही गैरप्रकार सहन करणार नाही. कुणाच्याही दबावाला घाबरणार नाही, असे सांगत शहरवासियांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. या लाईव्हनंतर दिवसभर याच प्रकाराची चर्चा अनेक ठिकाणी पहावयास मिळाली.

शासनाचीही फसवणूक?
महापालिकेतील ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या बॅंक खात्यावर पैसे स्वीकारले त्यांनी ते आपल्या आयकर विवरणात दाखविले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पैशांचा व्यवहार लपविणे ही शासनाची फसवणूक ठरते. त्यामुळे इन्कमटॅक्‍स व्हायोलेशन कायद्याद्वारेही या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वेतनवाढीची बक्षिसी
बॅंक खात्यावर पैसे घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्या यातील एका अधिकाऱ्याला सातव्या वेतन आयोगानुसार वर्ग एकची वेतनवाढ देण्यात आली आहे. वस्तुत: या अधिकाऱ्याची महापालिकेच्या वेबसाईटवर ज्येष्ठता यादीनुसार वर्ग दोनवर नियुक्ती असल्याचे दिसून येते. असे असतानाही तसेच पदोन्नतीबाबत न्यायालयात दावा दाखल असतानाही या अधिकाऱ्याला वेतनवाढीची बक्षिसी देऊन महापालिकेने नवा पायंडा पाडला आहे. काहीही केले तरी काहीच बिघडत नाही, असाच एक प्रकारे संदेश देण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

आणखी संबंधित बातम्या

Tejashwi Yadav : संघटित भ्रष्टाचारामुळे रेशन विक्रेते अडचणीत; तेजस्वी यादव यांचा आरोप

2026-09-09 16:48:25

Tejashwi Yadav : संघटित भ्रष्टाचारामुळे रेशन विक्रेते अडचणीत; तेजस्वी यादव यांचा आरोप

Namal Rajapaksa : नमल राजपक्षे यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक

2026-09-05 22:01:28

Namal Rajapaksa : नमल राजपक्षे यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक

Aaditya Thackeray : मुंबईतील मोकळ्या जागा भाजपसंबंधी व्यक्तींना दिल्या जात आहेत; आदित्य ठाकरे यांचा आरोप

2026-08-20 19:07:00

Aaditya Thackeray : मुंबईतील मोकळ्या जागा भाजपसंबंधी व्यक्तींना दिल्या जात आहेत; आदित्य ठाकरे यांचा आरोप

Satyendra Jain Arrested : मोठी बातमी! माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक; 'या' घोटाळ्याप्रकरणी कारवाई

2026-08-18 22:22:41

Satyendra Jain Arrested : मोठी बातमी! माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक; 'या' घोटाळ्याप्रकरणी कारवाई

Bribe News : मोठी खळबळ! बड्या अधिकाऱ्याला 45 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

2026-07-31 21:50:13

Bribe News : मोठी खळबळ! बड्या अधिकाऱ्याला 45 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक