#IPL2022 #RRvKKR | कोलकाताचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 30 वा सामना आज खेळला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आमनेसामने आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने राजस्थानविरुद्ध नाणेफेक(टाॅस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨@ShreyasIyer15 has won the toss & @KKRiders have elected to bowl against @rajasthanroyals.
Follow the match ▶️ https://t.co/f4zhSrBNHi#TATAIPL | #RRvKKR pic.twitter.com/WSIgF3iz0Z
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022
राजस्थान संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. करुण नायर, ओबेद मॅकॉय आणि ट्रेंट बोल्ट यांना आज संधी मिळाली आहे. रासी व्हॅन डर डुसेन, कुलदीप सेन आणि जिमी नीशम यांच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघात एक बदल करण्यात आला आहे. अमन खानच्या जागी शिवम मावीचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, यंदाच्या आयपीएलच्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने पाचपैकी तीन विजय मिळवले आहेत आणि सहा गुण आणि चांगल्या धावगतीसह पाचव्या स्थानावर आहे. कोलकाता संघाची मागील काही सामन्यात चांगली कामगिरी झालेली नाही आणि सहा पैकी तीन सामने जिंकून सहाव्या स्थानावर आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघ : आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), सुनील नरेन, पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
राजस्थान रॉयल्स संघ :
जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (C&W), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, युझवेंद्र चहल, प्रणीक कृष्णा.





