Live Blog : अर्थमंत्र्यांच्या घोषणांचा ‘अर्थ’ सोप्या शब्दांमध्ये
Updated On:

नवी दिल्ली – कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेला आलेली मळभ दूर करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. या पॅकेजमधील तरतुदींबाबत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन व अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर हे टप्प्याटप्प्याने माहिती देत आहेत. आज या मालिकेतील चौथी पत्रकार परिषद सुरु असून आज आत्मनिर्भर पॅकेजमधील कोणत्या उपाययोजनांची घोषणा होते हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा डिजिटल प्रभातचा हा लाईव्ह ब्लॉग.
- आज ८ क्षेत्रांना मिळणार मदत
- केंद्र गुंतवणूक वाढवणाऱ्या राज्याचं रँकिंग करणार
- कोळसा उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी ५० हजार कोटींची तरतूद
- कोळशाच्या व्यावसायिक उप्तादनावर भर; देशाला कोळश्याबाबत आत्मनिर्भर बनवणार
- कोळसा उत्पादनातील सरकारी कंपन्यांची मक्तेदारी कमी होणार
- संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवणार; संरक्षण क्षेत्राशी निगडित आयात कमी करणाऱ्यावर भर
- ऑर्डीनन्स फॅक्ट्रीचं खाजगीरण होणार नाही.
- संरक्षण क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढवली
- संरक्षण क्षेत्रात आता ७४ टक्के परकीय गुंतवणूक
- PPP मॉडेलद्वारे विमानतळांचा विकास





