अर्जुन कढे, ऋतुजा भोसले, शरण्या गवारे यांना अग्रमानांकन

एमएसएलटीएची मानांकन यादी जाहीर

मुंबई – 2018 च्या एमएसएलटीए वार्षिक मानांकन यादीत महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटू ऋतुजा भोसले, पुरुष गटातील मानांकित खेळाडू अर्जुन कढे यांसह सब-ज्युनियर गटातील राष्ट्रीय विजेती व 16 आणि 18 वर्षाखालील गटातील भारताची अव्वल मानांकित खेळाडू शरण्या गवारे, सब-ज्युनियर गटातील राष्ट्रीय विजेती सुदिप्ता कुमार आणि गार्गी पवार आशियाई कुमार गटातील उपविजेता सिद्धांत बांठिया, कुमार गटातील राष्ट्रीय विजेती व 14 वर्षाखालील भारताची अव्वल मानांकित खेळाडू वैष्णवी आडकर आणि 12 वर्षाखालील गटातील भारताचा क्र.1 खेळाडू मानस धामणे या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावला.

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेची 2018ची वार्षिक मानांकन यादी एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी आज जाहिर केली. 2018मध्ये महाराष्ट्रामध्ये जानेवारी ते डिसेंबर 2018 या कालावधीत 146 टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक स्पर्धांमुळे खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होत असून राष्ट्रीय पातळीवर आपले मानांकनात आगेकुच करण्याचीदेखील संधी मिळत असल्याचे अय्यर यांनी नमुद केले. 2018च्या वार्षिक मानांकन यादीत विविध गटात महाराष्ट्राच्या पाच खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. यामध्ये मुंबई विभागातून आर्यन भाटिया, आरव मेहता यांनी पुणे विभागातून अर्जुन गोहड, ईरा शहा आणि सोलापूर विभागातून नैनिका रेड्डी या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.

एमएसएलटीए व्हिजन कार्यक्रमाचा भाग असलेल्या खेळाडूंना शिष्यवृत्तीबरोबरच अव्वल मानांकित खेळाडूंना आगामी यूएसए, स्पेन आणि थायलंड येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पुरस्कृत करण्यात येणार आहे. पुणे विभांगातून यावर्षीच्या 2018च्या यादीत अर्जुन कढे(पुरुष एकेरी), ऋतुजा भोसले(महिला एकेरी),शरण्या गवारे(18वर्षाखालील मुली),शरण्या गवारे(16वर्षाखालील मुली),अर्जुन गोहड (14वर्षाखालील मुले), वैष्णवी आडकर(14वर्षाखालील मुली), मानस धामणे(12वर्षाखालील मुले), ईरा शहा(12वर्षाखालील मुली), मुंबई विभागातून आर्यन भाटिया(16 व 18 वर्षाखालील मुले), आरव मेहता(10 वर्षाखालील मुले), सोलपवूरच्या नैनिका रेड्डी या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.