Indapur : कर्मयोगीच्या निवडणुकीत पात्र उमेदवारांची यादी जाहीर
Indapur : सर्वसाधारण प्रतिनिधी गटात इंदापूर, कालठण, पळसदेव, गवण आणि शेळगाव या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय महिला राखीव आणि विविध प्रवर्गांतील प्रतिनिधींच्या जागांसाठीही उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. छाननीचा टप्पा पूर्ण झाल्याने निवडणूक प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन 2026-27 ते 2031-32 या कालावधीसाठी होणार्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी ही यादी प्रसिद्ध केली. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीतील पुढील घडामोडींकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकूण 51 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली होती. 19 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर सर्वसाधारण प्रतिनिधी गटातील इंदापूर, कालठण, पळसदेव, भिगवण आणि शेळगाव या पाच मतदारसंघांसह महिला राखीव, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच सहकारी उत्पादक व बिगर उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधी गटांतील पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
सर्वसाधारण प्रतिनिधी गटात इंदापूर, कालठण, पळसदेव, गवण आणि शेळगाव या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय महिला राखीव आणि विविध प्रवर्गांतील प्रतिनिधींच्या जागांसाठीही उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. छाननीचा टप्पा पूर्ण झाल्याने निवडणूक प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.
छाननी प्रक्रियेवर विरोधी उमेदवारांचे आक्षेप
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात उभ्या असलेल्या काही उमेदवारांनी अर्जांच्या छाननीदरम्यान आक्षेप व हरकती घेतल्याची माहिती समोर आली आहे. छाननी प्रक्रिया एकतर्फी झाल्याची भावना काही विरोधी उमेदवारांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या आरोपांबाबत निवडणूक निर्णय अधिकार्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे. संबंधित उमेदवारांनी सलग तीन वर्षे कारखान्याला ऊसपुरवठा केला आहे का आणि त्या ऊसपुरवठ्याचे पेमेंट बँकेमार्फत झाले आहे का, या मुद्द्यांवरूनही आक्षेप उपस्थित झाल्याची माहिती आहे. उमेदवारीच्या पात्रतेसाठी आवश्यक अटींची पूर्तता झाली आहे की नाही, हे संबंधित कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारे ठरणार आहे.
गटनिहाय वैध उमेदवारांची यादी
1) सर्वसाधारण प्रतिनिधी गट क्रमांक 1 – इंदापूर (7 उमेदवार) हिम्मत सुभेदार गायकवाड, पंडित मच्छिंद्र गुरगुडे, भास्कर सुभाष गुरगुडे, शांतिलाल दत्तात्रय शिंदे, राकेश रमेशप्रसाद शुक्ल, रविंद्र वामन सरडे, वामन पंढरीनाथ सरडे. 2) सर्वसाधारण गट क्रमांक 2 – कालठण (8 उमेदवार) दादाराम भगवान कांकणे, हनुमंत अंकुश जाधव, संपत विक्रम पवार, निलेश शामराव देवकर, हर्षवर्धन शहाजीराव पाटील, हरिश्चंद्र सदाशिव पारेकर, छगन धोंडीबा भोंगळे, अंकुश दत्तात्रय शहाणे. 3) सर्वसाधारण गट क्रमांक 3 – पळसदेव (8 उमेदवार), लक्ष्मण कृष्णा करे, महेंद्र पांडुरंग काळे, संतोष लक्ष्मण काळे, प्रवीण यादवराव देवकर, राजेंद्रकुमार प्रतापराव देवकर, श्रीकांत शिवराव देवकर, राजवर्धन हर्षवर्धन पाटील, विजयकुमार काशिनाथ शिंदे. 4) सर्वसाधारण गट क्रमांक 4 – भिगवण (4 उमेदवार) विजय विठ्ठल खर्चे, पराग रमेशराव जाधव, प्रमिला रमेशराव जाधव, रणजित नामदेव निकम. 5) सर्वसाधारण गट क्रमांक 5 – शेळगाव (3 उमेदवार). रोहित राजेंद्र गायकवाड 2. बिभीषण कल्याण नलवडे 3. अतुल शिवाजी शिंगाडे.
राखीव प्रवर्गातील उमेदवार
इतर मागास प्रवर्ग (2 उमेदवार) वसंत खंडू मोहोळकर, छगन धोंडीबा भोंगळे. भटक्या विमुक्त जाती व जमाती (2 उमेदवार) हरिश्चंद्र सदाशिव पारेकर 2. हौरा शंकर पारेकर. महिला राखीव प्रतिनिधी (3 उमेदवार) रत्नमाला संपत पवार, शारदा कुंभार पवार, सुमन नारायण अवहारे. अनुसूचित जाती/जमाती (1 उमेदवार) अमोल सुभाष जाधव. ‘ब’ वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था (2 उमेदवार) हर्षवर्धन शहाजीराव पाटील 2. राजवर्धन हर्षवर्धन पाटील





