Politics News : राजकारणात मोठा भूकंप! बंडखोर 19 खासदारांनी नावे समोर; पाहा यादी
Politics News : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षांतर्गत सुरू असलेला असंतोष आता थेट देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत पोहोचला आहे.

Politics News : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षांतर्गत सुरू असलेला असंतोष आता थेट देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत पोहोचला आहे. तृणमूल काँग्रेसला आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टीएमसीच्या एकूण 28 लोकसभा खासदारांपैकी तब्बल 19 ते 20 खासदारांनी एकत्र येत माजी मुख्यमंत्री टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाविरोधात उघड बंड पुकारल्याचे समजते.
या नाराज खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक अधिकृत पत्र सोपवून संसदेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या बंडखोर गटाने केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ज्येष्ठ नेत्यांच्या हाती बंडखोरीची सूत्रे –
राजकीय गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, टीएमसीमधील या ऐतिहासिक फुटीचे नेतृत्व पक्षाच्या ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार आणि शताब्दी रॉय यांसारखे दिग्गज चेहरे करत आहेत. लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवण्यापूर्वी या बंडखोर नेत्यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पश्चिम बंगालचे भाजपचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत एक गुप्त बैठक घेतल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. या बंडखोरीमुळे आता संसदेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
List of 19 rebel TMC MPs who have signed a letter to the Lok Sabha Speaker.
Kakoli Ghosh (Barasat)
Jagadish Chandra Basunia (Cooch Behar)
Khalilur Rahaman (Jangipur)
Yusuf Pathan (Berhampore)
Abu Taher Khan (Murshidabad)
Partha Bhowmick (Barrackpore)
Bapi Haldar (Mathurapur)… pic.twitter.com/3jYWNZxjDD— IANS (@ians_india) June 10, 2026
बंडखोर खासदारांचा संभाव्य आकडा –
टीएमसीच्या गोटातून आलेल्या बातम्यांनुसार, बंडखोरांच्या या यादीत शत्रुघ्न सिन्हा आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्यासह अनेक बड्या नावांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश (२/३) बहुमत आमच्याकडे असल्याचा दावा बंडखोर गटाने केला आहे.
“आम्ही दोन-तृतीयांश बहुमताचा आकडा पार केला असून, आमच्या गटात सामील होणाऱ्या खासदारांची संख्या सातत्याने वाढत आहे.”, असे खासदार शताब्दी रॉय यांनी म्हंटले आहे.
VIDEO | Kolkata, West Bengal: Commenting on Sushmita Dev’s resignation, TMC leader Kunal Ghosh says, “Other rebel leaders should also quit the Trinamool Congress instead of backing the BJP.”
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/sFrI1oT62h
— Press Trust of India (@PTI_News) June 10, 2026
ममता बॅनर्जींच्या गटाकडून दावे फेटाळले –
दरम्यान, संसदीय पक्षात झालेल्या या मोठ्या भूकंपानंतर ममता बॅनर्जी यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्याने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. “पक्षाचा कोणताही खासदार फुटलेला नाही, टीएमसी पूर्णपणे एकजूट आहे. कल्याण बॅनर्जी हेच लोकसभेत पक्षाचे मुख्य प्रतोद (व्हिप) राहतील,” असे ममता समर्थक गटाने स्पष्ट केले आहे.
VIDEO | Kolkata, West Bengal: TMC MP Satabdi Roy says, “We have secured a two-thirds majority, and the number of MPs joining our camp is increasing.”
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/JOY3SSCfzn
— Press Trust of India (@PTI_News) June 10, 2026
विधानसभेनंतर आता लोकसभेत ‘खेला’ –
काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल विधानसभेतही टीएमसीच्या सुमारे ५८ आमदारांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयांना आव्हान देत बंडखोरी केली होती. विधानसभेतील या वादळानंतर आता थेट लोकसभेत खासदारांनी उचललेल्या या पावलामुळे कोलकाता ते दिल्ली राजकीय भूकंप आला आहे. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वासाठी हा आतापर्यंतचा सर्वात कठीण काळ मानला जात असून, या घडामोडींमुळे बंगालच्या राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
बंडखोर तृणमूल काँग्रेस (TMC) खासदारांची यादी –
काकोली घोष (बारासात)
जगदीश चंद्र बसुनिया (कूचबिहार)
खलीलुर रहमान (जंगीपूर)
युसूफ पठाण (बेहरामपूर)
अबू ताहेर खान (मुर्शिदाबाद)
पार्थ भौमिक (बॅराकपूर)
बापी हलदार (मथुरापूर)
माला रॉय (कोलकाता दक्षिण)
मिताली बाग (आरामबाग)
दीपक अधिकारी (घाटल)
कालीपद सोरेन (झारग्राम)
जून मालिया (मेदिनीपूर)
अरूप चक्रवर्ती (बांकुरा)
डॉ. शर्मिला सरकार (बर्धमान पूर्व)
शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल)
असित कुमार माल (बोलपूर)
सताब्दी रॉय (बीरभूम)
रचना बॅनर्जी (हुगळी)





