स्टॉकहोम – जर्मनीतील संशोधक बेंजामिन लिस्ट आणि स्कॉटलंडमध्ये जन्म झालेले संशोधक डेव्हिड डब्लूसी मॅकमिलन यांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
“असिमेट्रिक ऑर्गॅनोकॅटलेसिस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रेणूंची रचना करण्यासाठी नवी पद्धती विकसित करण्याच्या कामाबद्दल त्यांना या प्रसिद्ध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. रॉयल स्विडीश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस गोरान हॅनसन यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली.
लिस्ट आणि मॅकमिलन यांनी 2000 साली स्वतंत्रपणे नवीन उत्प्रेरक निर्मिती केली आहे, असे नोबेल कमिटीने म्हटले आहे. त्यांच्या या शोधाचा फायदा मानवाला मोठ्या प्रमाणावर होतो आहे, असे नोबेल पॅनेलच्या सदस्या पेर्निला विटंग स्टेफशेड यांनी म्हटले आहे.
लिस्ट आणि मॅकमिलन या दोघांनीही नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मॅकमिलन हे देखील कृत्रिम पद्धतीने मोलेक्युल तयार करत असल्याचे आपल्याला माहिती नव्हते, असे लिस्ट यांनी म्हटले आहे.
नोबेल पुरस्कार म्हणून सुवर्णपदक आणि 10 हजार स्वीडीश क्रोनोर (1.14 दशलक्ष डॉलर) ेवढी रक्कम दोघांमध्ये समान विभागून दिली जाणार आहे.