सर्व बॅंक खाती ‘या’ तारखेच्या आत आधारशी जोडा
Updated On:

मुंबई – बॅंकांनी आपल्या ग्राहकांची खाती 31 मार्च 2021 च्या आत आधार क्रमांकाशी जोडावी अशी सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.
सर्वसमावेशक विकासासाठी बॅंक खाते आधारशी जोडणे गरजेचे आहे. अजूनही बरीच खाती आधार क्रमांकाशी जोडलेली नाहीत.
इंडियन बॅंक असोसिएशन या बॅंकांच्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सिताराम म्हणाल्या की, ज्या खातेदाराचे खाते पॅन क्रमांकाशी जोडले जाणे आवश्यक आहे, ते खाते जोडले जावे. ग्राहकांनी रोखीने व्यवहार करू नये यासाठी बॅंकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. युपीआयचा जास्तीत जास्त प्रसार बॅंकांनी करावा. बॅंकांनी जास्तीत जास्त ग्राहकांना रुपे कार्ड देण्याची गरज असल्याचे सीतारमन यांनी सांगितले.





