Lifestyle: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि शरीराच्या सर्व यंत्रणा व्यवस्थित चालण्यासाठी विविध प्रकारचे विटामिन्स आणि मिनरल्स आवश्यक असतात. चुकीच्या आहारामुळे आणि अनियमित जीवनशैलीमुळे आज अनेक लोकांमध्ये विटामिन D, विटामिन B12, आयर्न, कॅल्शियम, तसेच विटामिन C आणि E यांची कमतरता दिसून येते. ही कमतरता नेहमीच बाजारातील सप्लिमेंट्सनी भरून काढावी असे नाही. घरच्या घरीही नैसर्गिक मल्टीव्हिटामिन पावडर तयार करता येऊ शकते. घरच्या घरी बनवा मल्टीव्हिटामिन पावडर. स्वयंपाक घरात सहज मिळणाऱ्या सीड्स आणि नट्सपासून पोषणमूल्यांनी समृद्ध पावडर बनवता येते. काय लागेल? फ्लॅक्स सीड्स (अळशी) तिळाचे बी भोपळ्याचे बी खजुराच्या बिया टरबूजाच्या बिया शेंगदाणे भाजलेले हरभरे बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड कसे बनवायचे? 1. अळशी आणि ज्यांना गरज आहे ते बी थोडे भाजून घ्या. 2. सर्व घटक सम प्रमाणात घ्या. 3. मिक्सरमध्ये बारीक करून एकत्र मिसळा. 4. एअरटाइट डब्यात साठवा. ही नैसर्गिक मल्टीव्हिटामिन पावडर शरीराला आवश्यक पोषक तत्वे नैसर्गिक पद्धतीने पुरवू शकते. कधी घ्यायच? रोज सकाळी दूधामध्ये 1–2 चमचे घालून प्या. किंवा, आल्याचे/हळदीचे पाणी उकळून त्यात मिसळूनही घेऊ शकता. यात शेवग्याचे ब मिसळल्यास पोषकता आणखी वाढते. ही पावडर सकाळी घेणे उत्तम मानले जाते, कारण ती प्रोटीन आणि मिनरल्सचा चांगला स्रोत आहे. लहान मुलांसाठी कसे तयार करावे? लहान मुलांसाठी नट्स किंवा सीड्स देणे योग्य नसते. यासाठी, अंकुरित मूगडाळ व अंकुरित गहू हे दोन्ही रोस्ट करून, सुकवून पावडर बनवा. ही पावडर मुलांच्या सूपमध्ये किंवा डाळीत घालून देऊ शकता. तज्ज्ञांची सूचना तुमची पित्त प्रकृती असल्यास किंवा नट्स/सीड्सची अॅलर्जी असल्यास ही पावडर त्रासदायक ठरू शकतो. हे घटक उष्ण असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात वापरू नये. कोणतीही मेडिकल कंडीशन असल्यास तज्ञांचा सल्ला घेऊनच ही पावडर आहारात समाविष्ट करा.