मार्च महिन्यात एलआयसीचा आयपीओ
Updated On:

नवी दिल्ली – एलआयसी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ जानेवारीच्या अखेरीस प्राथमिक समभाग विक्रीसाठी म्हणजे आयपीओसाठी बाजार नियंत्रक सेबीकडे परवानगी मागणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यामध्ये एलआयसीचा बलाढ्य आयपीओ शेअर बाजारावर नोंदला जाण्याची शक्यता वाढली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात आयपीओसाठीचे कामकाज व्यवस्थित चालले आहे की नाही याचा आढावा घेतला आहे.
एलआयसी सध्या तिसऱ्या तिमाहीचा ताळेबंद तयार करीत आहे. एलआयसीचे किती भागभांडवल या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना उपलब्ध करायचे या संदर्भात निर्णय सरकार लवकरच घेण्याची शक्यता आहे. हा आयपीओ भारतातील कंपन्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे.




